Mug Lagavd Mahiti: मूग लागवडीची ए टू झेड संपूर्ण माहिती

Mug Lagavd Mahiti: मूग लागवडीची ए टू झेड संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये मूग लागवडीबद्दल त्याचबरोबर मुगाबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मूग या पिकाची लागवड कशी करावी मुगाचे आरोग्यासाठी कोणकोणते फायदे आहेत.या लेखामध्ये मुगाविषयी संपूर्ण माहिती दिली जाणार आहे.मुगा बद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचावा.

मुग हे पीक भारतामध्ये त्याचबरोबर इतर देशांमध्ये देखील घेतली जाते. मुग या पिकाला भरपूर मागणी आहे कारण आपण दररोजच्या आहारामध्ये देखील मुगाचा वापर करत असतो. त्याचबरोबर मुगाच्या आपल्या आरोग्यासाठी सुद्धा फायदे आहेत आणि आपल्या शरीराला जे महत्त्वाचे घटक गरजेचे असतात ते सुद्धा मुगामध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे मुगाचे सेवन भरपूर घरांमध्ये केले जाते. मुगाचे वरण देखील केले जाते. असेच अजून मुगाचे भरपूर फायदे आहेत ते सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत. प्रथमता आपण मूग हा कोण कोणत्या रंगाचा असतो ते जाणून घेऊया. मुगाचे वेगवेगळे रंग असतात. त्यामध्ये काळा, पांढरा, लाल, हिरवा आणि पिवळा असे वेगवेगळे रंग हे मुलाला असतात.

मुग लागवड कशी करावी याबद्दल माहिती पाहूया.

मूग लागवड करण्यासाठी आपल्याला जमीन त्याचबरोबर त्या जमिनीमध्ये लावण्या अगोदर काय काय करावे. तसेच मुग हा कोणत्या वेळेला लावला पाहिजे हे माहीत असणे गरजेचे आहे. तर आपण या सर्वांबद्दल माहिती जाणून घेऊ. मूग लागवडीसाठी आपण पूर्ण जमीन रिकामी सोडत नाही. मूग हा तुरीच्या पिकामध्ये लावला जातो. तुरीच्या दोन लाईनच्या मधोमध मुग पीक प्रामुख्याने घेतले जाते. तसं पाहिलं तर शेतकरी आपल्या मनाने कोठेही मुगाची पेरणी करू शकतात. आणि काही शेतकरी करत देखील असतात. कोणी तुरीच्या मध्ये तर कोणी सरकीच्या मध्ये देखील मुगाची लागवड करताना आपण बघतो. दोन ते तीन महिन्यांमध्ये मुगाचे पीक चांगल्या प्रमाणात येते. मुगासाठी जास्त पाण्याची गरज लागत नाही थोडा पाऊस असला तरी सुद्धा मूग हे पीक चांगले येऊ शकते. मूग हे पीक आपण मिश्र पीक पद्धतीने देखील घेऊ शकतो. मिश्र पीक पद्धत म्हणजेच एका जमिनीमध्ये दोन पिकांची लागवड आपण करू शकतो ते म्हणजेच तुरीमध्ये मुग.

मूग लागवड करण्यासाठी कोणती जमीन वापरावी

मुग लागवड करण्यासाठी हलकी जमीन वापरू नये. मध्यम ते भारी त्याचबरोबर पाण्याचा चांगला निसरा होणारी जमीन ही मूग लागवडीसाठी लागते. ज्या जमिनीमध्ये जास्त वेळ पाणी साचून राहते किंवा ती जमीन झोपड बनते अशी जमिनीमध्ये मुगाची लागवड करू नये. या जमिनीमध्ये देखील मुग येईल परंतु त्यातून जसे पाहिजे तसे उत्पन्न आपल्याला मिळणार नाही त्यामुळे आपण मध्यम ते भारी जमीन वापरावी.Mug Lagavd Mahiti

मूग लागवड करण्यासाठी कोणकोणती पूर्वमशागत करावी

कोणत्याही पिकाची लागवड करायची म्हणलं तरी सुद्धा आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपली जमीन ही नांगरून घ्यावी लागते. आपण आपली जमीन लवकरच नांगरावी. ज्यावेळी आपल्या शेतामधील सर्व पिके निघतील त्यावेळी जेवढे लवकर होईल तेवढे लवकर आपण आपली जमीन नांगरून घ्यावी. म्हणजेच ती जमीन उन्हाळ्यामध्ये थोडी तापली जाते. आणि जमीन चांगली तापू दिली तर आपल्या शेतामध्ये पीक देखील चांगले येते आणि गवताचे प्रमाण थोडे कमी राहते. उन्हाळ्यामध्ये नांगरून ठेवलेल्या जमिनीवर पावसाळा सुरू झाल्यानंतर पाया मारून घ्याव्या लागतात. पाळ्या मारून जमीन ही सपाट करून घ्यावी. आणि त्या जमिनीमध्ये जर काही काड्या, धसकटे असतील तर ते आपण पिकाची लागवड करण्या अगोदरच वेचून घ्यावे. जर आपल्या घरी काही शेणखत असेल तर ते शेणखत देखील आपण हेक्टरी 5 टन टाकून घ्यावे. शेणखत हे चांगले कुजलेले पाहिजे म्हणजे आपले पीक चांगले येईल त्याचबरोबर त्या पिकातून आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये उत्पन्न मिळेल. हीच झाली मूग लागवडीच्या अगोदरची मशागत.

मूग या पिकाचे लागवड कधी करावी

आपण पाहतो सर्व शेतकरी हे पावसाळ्यामध्ये नवनवीन पिकांची लागवड करत असतात. कारण उन्हाळ्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या जमिनीत नांगरून त्या चांगल्या केलेल्या असतात. त्यानंतर सर्व शेतकरी ही आतुरतेने पावसाची वाट बघतात. चांगला पाऊस झाला आणि जून ची सुरुवात किंवा शेवटच्या आठवड्यापासून पिकाच्या पेरण्या करण्यास सुरुवात करतात. तसेच मुग या पिकाची पेरणी करायची म्हणलं तरी सुद्धा आपण जूनच्या शेवटच्या आठवड्यात केली पाहिजे किंवा जुलै च्या पहिल्या आठवड्यामध्ये केली तरी सुद्धा चालते. जर या पेरणीमध्ये उशीर झाला तर आपण पेरलेले पीक हे चांगले येत नाही त्याचबरोबर त्या पिकाची वाढ सुद्धा जशी व्हायला पाहिजे तशी होत नाही. पीक चांगले न आल्यामुळे आपल्या उत्पादनात घट होते. त्याचबरोबर आपले उत्पन्न देखील चांगले होत नाही. त्यामुळे आपण मूग या पिकाची पेरणी वेळेवर करावी. पेरणी वेळेवर केल्यानंतर आपल्याला आपल्या पिकांमधून चांगला नफा त्याचबरोबर चांगले उत्पन्न मिळू शकते.

मूग या पिकासाठी किती बियाणे लागतात

सर्वप्रथम आपल्याला मूळ या पिकाची पेरणी करण्या अगोदर आपण आपल्या किती जमिनीमध्ये मूक पेरणार आहोत हे ठरवून घ्यावे. तसे पाहिले तर हेक्‍टरी 10 ते 15 किलो बियाणे एक हेक्टर साठी पुरेसा आहे. एका हेक्टर मध्ये आपण दहा ते पंधरा किलो बियाणे वापरू शकतो. जर आपल्या जमिनीला हे बियाणे कमी पडत असेल तर आपण अजून सुद्धा वापरू शकतो आणि उरत असेल तरीसुद्धा काही अडचण नाही.

मूग पिकाची लागवड केल्यानंतर त्या पिकाला आपल्याला किती खत द्यावे लागेल. मग या पिकासाठी आपण खत टाकले तरीसुद्धा चांगले आहे आणि जर आपल्याकडून नाही टाकने झाले तरीसुद्धा मूग हे पीक चांगले येते. खत टाकल्यानंतर आपल्या उत्पादनात फरक पडतो. खतामुळे आपले पीक चांगले येऊ शकते आणि आपल्याला चांगला नफा मिळू शकतो. तसेच मग या पिकामध्ये आपल्याला आंतरमशागत देखील करावी लागते. मग या पिकामध्ये आपल्याला सुरुवातीचा जो एक महिना असतो त्या महिन्यामध्ये त्याच्यामध्ये दोन कोळपण्या कराव्या लागतात तसेच एक किंवा दोन खुरपणी देखील करावे लागतात. आपल्याला सांगितल्यापेक्षा जास्त देखील खुरपणी किंवा खुरपण्या लागतील कारण हे गवतावर अवलंबून असते. मूग हे पीक आंतरपीक म्हणून ओळखले जाते. कारण आपण या पिकाची लागवड ही तूर ,ज्वारी आणि कापूस यामध्ये करू शकतो.

मुगाच्या वाढीसाठी तापमान हे चांगले असते. उन्हाळ्यामध्ये देखील मुगाची लागवड केली जाते. ज्यांच्याकडे पाणी आहे असे शेतकरी या पिकाची लागवड करू शकतात. मग या पिकासाठी उन्हाळी तापमान चांगले असते. कारण जर उन्हाळी तापमान असेल तर या पिकाची वाढ चांगली होते. जर आपण चांगल्या बियांची निवड केली असेल तर आपण आपले पीक हे कमी कालावधीमध्ये घेऊ शकतो आणि कमी पाण्यामध्ये हे पीक चांगले येईल. मुगांच्या जाती कोणकोणत्या आहेत हे आपल्याला माहीतच असेल. मुगाची कोणती जात लावायची आहे हे आपण आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार लावली तरीसुद्धा चालते.

मुग या पिकाची लागवड जर आपण उन्हाळी हंगामात करत असला तर एका हेक्टर मध्ये पंधरा ते वीस किलो बियाणे आपल्याला लागते. आपण या बियाणांची जात ही चांगली त्याचबरोबर अनुभवानुसार वापरावी. जर मूळ या पिकाची पेरणी आपण उन्हाळ्यामध्ये करत असेल तर ज्या मुगाच्या दोन ओळी असतात त्या ओळीमध्ये कमीत कमी 30 सेंटिमीटर एवढे अंतर असायला पाहिजे. आणि मुगाचे जे दोन झाडे असतात त्या झाडांमध्ये 10 सेंटिमीटर अंतर ठेवूनच पेरणी करावी. म्हणजे आपले उन्हाळी पीक देखील चांगले येईल. आणि त्या उन्हाळी पिकांमधून चांगला नफा मिळू शकतो. मग या पिकावर एक दोन फवारणी देखील करावी लागतात. कारण मूग उगल्यानंतर थोड्या दिवसांनी त्यावरती मावा त्याचबरोबर आळी सुद्धा पडते त्यामुळे वेळेच्या वेळी आपण त्या पिकांवर फवारणी करावी. तसेच मुगासाठी होईल तेवढे का होईना खत वापरावे. आपण पेरणी करण्या अगोदर ज्या बिया आहेत त्याच्यावर जिवाणू व बुरशीनाशक संवर्धनाची प्रक्रिया देखील करू शकतो. तर ती प्रक्रिया करायची आहे का नाही हे आपण ठरवावे. केली तरीसुद्धा चालते आणि नाही केली तरी पण काही अडचण येत नाही. पण आपण आपल्या पिकाला जेवढी काळजी लावून तेवढेच त्याचे उत्पन्न चांगले येते.

ही आहे मूग या पिकाच्या लागवडीबद्दल माहिती तसेच मूग हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे आणि बरेच जण या मुगाची वरण आवडीने खात असतात. यामुळे आपण आपल्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामापासून दूर राहू शकतो. या मुगामुळे बरेच रोप टाळले देखील जातात ते म्हणजेच हृदयविकार ,मधुमेह , लठ्ठपणा आणि कर्करोग. या आजारांपासून सुटका देखील मिळू शकतो. त्यामुळे सर्वजणांनी आवडीने मुगाचे वरण खावे. मुगाची लागवड या सांगितलेल्या पद्धतीने करावी.Mug Lagavd Mahiti

Sharing Is Caring:

Leave a Comment