Nagapnchami Mahiti: नागपंचमी साजरी का केली जाते याबद्दलची संपूर्ण माहिती
नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये नागपंचमी बद्दल माहिती पाहणार आहोत. नागपंचमी का साजरी केली जाते, नागपंचमी दिवशी पूजा कशी करावी, पूजा करत असताना काय काय घ्यावे तसेच नागपंचमीबद्दल संपूर्ण माहिती आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. नागपंचमी बद्दल सर्व माहिती आपल्याला माहीतच असेल परंतु तरीसुद्धा या लेखांमध्ये अजून थोडी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे त्यामुळे जर आपल्याला नागपंचमी बद्दल अजून माहिती जाणून घ्यायचे असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचवा.
नागपंचमी हा एक सण आहे. हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नागपंचमी या सणाबद्दल जाणून घ्यायचे म्हणले तर या दिवशी झोका देखील खेळले जाते त्याचबरोबर वारुळाचे म्हणजेच नागोबाची पूजा केली जाते. नागपंचमी हा एक असा सण आहे तो श्रावण महिन्यामध्ये येत असतो. यावर्षी नागपंचमी हा सण ऑगस्ट महिन्यामध्ये आलेला आहे. यावर्षी श्रावण मासाची सुरुवात ही ऑगस्ट महिन्यामध्ये झालेली आहे. 9 ऑगस्ट 2024 म्हणजे आज नागपंचमी आहे. नागपंचमी या सणाला प्रत्येक घरोघरी कानुले त्याचबरोबर लह्याचा नैवेद्य हा नागोबा म्हणजेच वारुळाला दाखवला जातो.
नागपंचमी ही पावसाळा ऋतूमध्ये येते. आपल्या सर्वांना माहित आहे पावसाळ्यामध्ये सर्व ठिकाणी वातावरण हे गार असते त्यामुळे नाग हे आपल्या बिळातून बाहेर म्हणजेच जमिनीवर येतात. बिळातून बाहेर पडलेला नागामुळे कोणालाही त्रास होऊ नये, त्याचबरोबर कोणावरही वाईट वेळ येऊ नये तसेच त्याचे वाईट परिणाम कोणावरती होऊ नये म्हणून नागपंचमी साजरी करण्यात येऊ लागली. नागपंचमी साजरी करणे म्हणजेच नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी ही पूजा करण्यात येते असे म्हटले जाते. नागदेवतेची पूजा करणे म्हणजेच नागपंचमी. लहान मुले हे नागपंचमी दिवशी झोका खेळण्यासाठी उत्सुक असतात. तसेच बायका या वारुळाला जाऊन तिथे पूजा करण्यासाठी उत्सुक राहतात.
यावर्षी नागपंचमी कोणत्या महिन्यात व किती तारखेला आलेली आहे ते जाणून घेऊ
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नागपंचमी श्रावण महिन्यामध्ये तसेच पावसाळा ऋतूमध्ये आलेली आहे. नागपंचमी ही ऑगस्ट महिन्यामध्ये आहे. 9 ऑगस्ट 2024 ला नागपंचमी हा सण आहे. नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहाने घरोघरी साजरा केला जाणारा सण आहे. या सणाला शक्य होईल तेवढे झोपे देखील बांधण्यात येतात आणि झोके घेण्यासाठी लहान मुले पूर्ण गावभर हिंडत असतात.
नागपंचमी हा सण का साजरा केला जातो
नागपंचमी हा सण साजरा करण्यामागे कोणत्या हेतू आहे त्याचबरोबर या सणाला नागोबाची पूजा काय केली जाते याबद्दल माहिती पाहू. नागपंचमी साजरी करण्यामागे एक पहिल्या काळातील कथा आहे .त्या कथेमध्ये काय सांगितले आहे हे आपण जाणून घेऊ. पुरातीन काळातील कथेनुसार साप चावल्यामुळे अभिमन्यूचा मुलगा राजा याचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू झालेला पाहून त्याच्या मुलाला हे पाहवले नाही. तर त्या मुलाने त्याच्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याचे ठरवले. वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्या मुलाने सर्व नागांना मारण्याचे ठरवले. सर्व नागांना मारण्यासाठी त्या मुलाने नागदह यज्ञ केला. जगातील सर्व साथ हे या नागधूमय यज्ञांमध्ये जळू लागले. परंतु त्याचवेळी सर्पांनी त्यांचे रक्षण करण्यासाठी एका मुलींचा आश्रय घेतला. ते मुनी म्हणजेच आस्तिक मुनी. ऋषींनी त्या अभिमन्यूच्या मुलाला म्हणजेच जनमेज याला याला समजावून सांगितले. जनमेज हा अभिमन्यूचा मुलगा होता. त्या ऋषींनी अभिमन्यूच्या समजावल्यामुळे त्याला हा यज्ञ थांबवा लागला. त्या ऋषींनी हा यज्ञ थांबवला. अशी ही एक पुरातील काळातील घटना घडलेली आहे. शुक्ल पक्षाची पंचमी होती त्याच दिवशी ही घटना घडली. त्या दिवशी ही घटना घडल्यामुळे आपल्याला नागपंचमी हा सण सुरू झाला. म्हणजेच ते आस्तिक मुनी जे होते त्यांनी त्या दिवशी अभिमन्यूच्या मुलाला थांबवले आणि सापांचे रक्षण केले या प्रसंगा नंतरच नागपंचमी हा एक सण सुरू झाला.
नागपंचमी ही साजरी करण्यामागे पुरात तीन काळातील एका घटनेचा संबंध आहे. कोणताही सण साजरा करण्यामागे काही ना काही हेतू असतो. तसेच नागपंचमी या सणाच्या मागे देखील आहे आणि तो आपण वरील बघितलेला आहे. आपल्या सर्वांना माहित आहे नागपंचमीच्या एक दिवसाआधी आपण भावाचा उपवास करत असतो. हा उपवास आपण त्याच दिवशी न सोडवता नागपंचमीच्या दिवशी वारुळाला जाऊन नागोबाची पूजा केल्यानंतरच सोडतो. नागोबालाच आपण आपला भाव देखील मानलेले आहे. आणि हा नागपंचमीच्या एक दिवस आधीचा उपवास हा भावाचा उपवास म्हणून धरण्यात येतो. हा उपवास महिला आणि कन्याकुमारी म्हणजेच मुली सुद्धा धरतात.
नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्याची प्रथा सुद्धा दिवसेंदिवस चालू आहे. नागपंचमीच्या दिवशी कमीत कमी पाच झोके तरी खेळावे असे म्हटले जाते. नागपंचमी या दिवशी नागोबाला लय हा आणि कानोळे याचा सर्वात जास्त मान आहे. नागपंचमी हा सण सर्वात जास्त लहान मुलांना आवडतं त्याचबरोबर त्यांना या सणाची जास्त उत्सुकता असते.
नागपंचमीच्या दिवशी नागोबाची पूजा करण्यासाठी बऱ्याचश्या घरी नागदेवतेचे फोटो आणले जातात. जर नागदेवतेचे फोटो नाही आणला तर धातूपासून बनवलेल्या नागदेवतेची देखील पूजा केली जाते. तसंच नागदेवतेला या दिवशी दूध, खीर आणि लय यांचा नैवेद्य दाखवला जातो. लह्याला नागपंचमी या सणाला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे. नागदेवतेची पूजा घरात त्याचबरोबर बाहेर ज्या ठिकाणी वारूळ आहे त्या ठिकाणी देखील केली जाते.
नागपंचमीच्या दिवशी आपण कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊ
आपण पाहतो पूर्वीच्या काही प्रत्येक सणाबद्दल जी काही माहिती आहे ती सर्व जण काळात होते. परंतु दिवसेंदिवस सणाला घरोवर एक वेगळेच वळण देण्यात येत आहे. सुरुवातीच्या काही नागोबाची पूजा करण्यासाठी दोन दिवस जावे लागत होते परंतु आता कामानिमित्त बायका एकाच दिवशी नागोबाची पूजा करतात. सुरुवातीच्या काळामध्ये नागपंचमीच्या दिवशी काही गोष्टींचे अगदी कटाक्षाने पालन केले जायचे. ते म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी शेतामध्ये नांगर कोणीही चालवत नसे, शेतामध्ये अथवा कोठेही कोणतही हत्यार वापरू नये आणि शेतामध्ये खुरपणी कोळपणी असे कोणतेही काम या नागपंचमीच्या दिवशी करू नये.Nagapnchami Mahiti
नागपंचमीच्या दिवशी नागोबाची पूजन का केली जाते
आपण पाहतो हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक वनस्पती प्राणी त्याचबरोबर जी संपूर्ण सृष्टी आहे त्या सर्व सृष्टीला देवाच्या रूपात पाहिलं जातं. प्राचीन काळामध्ये जे ऋषीमुनी राहत असे, त्या ऋषीमुनींनी धर्माशी सर्व पोज आणि पर्व तसेच उत्सवाचं नातं हे जोडलं गेलं आहे. यामधून आपल्याला असे लक्षात येते की एकीकडे सगळ्यांची जी धार्मिक आस्था, आतुरता असते ती वाढवली जाते आणि दुसरीकडे त्या व्यक्तींना नकळत म्हणजेच अप्रत्यक्षरीत्या पर्यावरणाशी देखील जोडले जाते. पर्यावरणाशी जोडण्याचं काम देखील करण्यात येत. हेच तर आहे सण आणि पर्यावरणाचं एक नातं. म्हणून तर नागपंचमीला नागोबाची पूजा करून त्या दिवशी उपवास पकडला जातो. नागोबाला देखील देवी प्राण्यांच्या श्रेणीत ठेवण्यात आलेला आहे. देवी प्राण्यांच्या श्रेणीत ठेवण्यात आल्यामुळे नागदर्शन आणि नागोबाच्या पूजेचं विशेष महत्त्व हे नागपंचमीला आहे.
नागपंचमी हा श्रावण महिन्यात येणारा पहिला सण आहे. प्राण्यांबद्दल सर्व व्यक्तीच्या मनात आदर असतो परंतु नाग या प्राण्याबद्दल व्यक्तीच्या मनामध्ये आदर त्याचबरोबर पूजा भावना मनात रुजवाव्या म्हणून हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. नागोबा हा शेतकऱ्याचा मित्र आहे. नागपंचमीच्या दिवशी सर्वांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी त्याचबरोबर सर्व स्वच्छता ठेवावी. तसेच स्त्रियांनी अंघोळ केल्यानंतर नागपंचमीच्या दिवशी नवीन कपडे घालावे त्याचबरोबर जे काही अलंकार असतील ते सुद्धा धारण करावे. कारण स्त्रियांना या दिवशी नागोबाची पूजा करावी लागते. आपण पाहतो बऱ्याचशा स्त्रिया पूजेला जावे लागते म्हणून नागपंचमीच्या दोन दिवस अगोदरच हातावर मेहंदी देखील लावत असतात. विवाहित महिला या नागपंचमीला आपल्या माहेरी जात असतात. काही महिला जातात काही सासरी देखील नागपंचमी साजरी करतात. विवाहित महिलांना माहेरी जाण्यासाठी त्यांचा भाऊ त्या दिवशी त्यांना घेऊन जातो. महिला या नागपंचमीच्या दिवशी झोका खेळून त्याचबरोबर नागदेवतेची पूजा करून मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करत असतात.
अशी आहे नागपंचमी बद्दल सविस्तर माहिती त्याचबरोबर पुरातील काळात घडलेली कथा देखील या लेखांमध्ये सांगण्यात आलेली आहे. तसेच नागपंचमीला पुरणाचा नैवेद्य देखील नागदेवतेला दाखवला जातो.Nagapnchami Mahiti