Lathpana Reason And Solution: लठ्ठपणा का होतो व त्यावरील उपाय

Lathpana Reason And Solution: लठ्ठपणा का होतो व त्यावरील उपाय

नमस्कार मित्रांनो आपण आज या लेखांमध्ये पाहणार आहोत की आपल्या शरीरावर जी चरबी वाढलेली आहे ती वाढती चरबी कमी करण्यासाठी आपण कोण कोणते घरगुती उपाय करू शकतात. वाढती चरबी कमी करण्यासाठी आपण कशा कशाचा वापर करू शकतो. सर्वप्रथम आपल्याला हे बघायचे आहे की आपल्या शरीरावर चरबी नेमके का वाढते. दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहत आहोत बऱ्याच व्यक्तीची तब्येत ही सुरुवातीला चांगली असते परंतु हळूहळू त्या व्यक्तीची चरबी वाढायला सुरुवात होते,ती चरबी का वाढते हे आपण जाणून घेऊ. आपल्याला जर आपली वाढती चरबी कमी करायचे असेल तर हा लेख आपण संपूर्ण वाचावा. यामध्ये सगळी माहिती ही आपल्यासाठी महत्त्वाची त्याचबरोबर फायदेशीर आहे.

दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीची कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी धावपळ चालू आहे. या धावपळीच्या वेगामध्ये आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाहीत. धावपळीच्या या वेगामध्ये आपण आपल्या शरीराकडे लक्ष न दिल्यामुळे आपल्या शरीराची चरबी वाढत जाते. चरबी वाढणे म्हणजे नेमकं काय? तर चरबी वाढणे म्हणजेच लठ्ठपणा होय. हा लठ्ठपणा आपल्यासाठी चांगला नाही. लठ्ठपणा चांगला का नाही त्याची कारणे पाहूया. लठ्ठपणा वाढल्याने आपल्या शरीरावर वेगवेगळे परिणाम दिसून येतात त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळ्या आजाराशी लढावे लागते. एकदा का लठ्ठपणा वाढला तर आपल्या सोबत आजाराची साखळी देखील वाढत जाते. त्यामुळे आपण आपल्या शरीराकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या पाठीमागे कितीही धावपळ असली तरी सुद्धा आपण आपल्या शरीरासाठी त्याचबरोबर स्वतःसाठी टाईम काढला पाहिजे.

लठ्ठपणा वाढला की आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. लठ्ठपणामुळे आपल्याला डायबिटीज, बीपी त्याचबरोबर हृदयरोग आणि हाडांशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या आजाराशी तोंड द्यावे लागते. या समस्या पासून दूर राहायचे असेल तर आपल्याला आपल्या शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्या स्वतःकडे लक्ष देणे.तसेच स्वतःला थोडा वेळ काढावा.Lathpana Reason And Solution

चरबी वाढण्यामागची कारणे जाणून घेऊ..

1) झोप पूर्ण न होणे

लठ्ठपणा किंवा चरबी वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे झोप पूर्ण न होणे. आपण म्हणत असाल की आमची झोप तर पूर्ण होते तरीसुद्धा आमची चरबी का वाढते. चरबी वाढण्यामागचे एक कारण नसते. चरबी वाढण्यामागचे अनेक कारणे असतात त्यामधील हे एक कारण आहे. सध्याच्या या काळामध्ये बऱ्याचशा व्यक्तीची झोप ही पूर्ण होत नाही. झोप पूर्ण न होण्याचे कारण म्हणजे मोबाईल. दिवसभर आपण काही ना काही कामांमध्ये अडकलेले असतो त्यामुळे आपण रात्री निवांत कितीही वेळ मोबाईल पाहत बसतो. नंतर मध्यरात्री आपण झोपतो आणि सकाळी उशिरा उठतो.

त्यामुळे आपल्याला आपली झोप पूर्ण झाल्यासारखे वाटते परंतु ही झोप पूर्ण झोप नसते. जर आपल्याला पूर्ण झोप घ्यायचे असेल तर आपण रात्री दहा वाजता झोपले पाहिजे त्याचबरोबर सकाळी पाच वाजता उठले तरीसुद्धा पूर्ण झोप होते. शरीराला सहा ते सात तास झोप आवश्यक आहे परंतु ही झोप कोणत्याही टायमिंगची नाही. झोपेला सुद्धा एक वेळ असते त्याच वेळेत आपण झोपले पाहिजे.

तरच आपण आपल्या तब्येतीवर नियंत्रण ठेवू शकतो. चरबी वाढण्याचे पहिले व मुख्य कारण म्हणजेच झोप पूर्ण न होणे किंवा कोणत्याही वेळेला झोपणे.

2) आहारामध्ये साखर तेल आणि मैदा यांचे जास्त प्रमाणात वापर करणे

दैनंदिन जीवनामध्ये सध्या बऱ्याच व्यक्तींना घरचे खाणे आवडत नाही. चवीसाठी बरेच व्यक्ती बाहेरचे वेगवेगळे पदार्थ खात असतात परंतु हे पदार्थ खाल्ल्यानंतर आपली चरबी वाढण्यासाठी सुरुवात होते हे त्यांच्या लक्षात येत नाही.

बाहेरचे खाल्ल्यानंतर सुद्धा आपली चरबी वाढायला हळूहळू सुरुवात होत असते. तुम्ही म्हणताल बाहेरचे खाल्ल्याने का चरबी वाढते त्याचे कारण आपण जे बाहेरील पदार्थ खात असतो.त्यामध्ये जास्त प्रमाणात तेलाचा मैद्याचा वापर केलेला असतो आणि हेच तेल मैदा आपल्या शरीरासाठी योग्य नाही. जास्त प्रमाणात तेलाचा आणि मैद्याचा वापर केल्याने आपल्या शरीरावरील चरबी वाढते. त्यामुळे आपण जेवढे होईल तेवढे बाहेरचे खाणे टाळावे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जवळपास सर्वच व्यक्ती हे बाहेरचे पीएफ येत असतात.

जसे की वेगवेगळ्या फळांचे ज्यूस, कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम यासारखे पेय घेत असतात त्यामुळे सुद्धा शरीरावरील चरबी वाढते. त्याचबरोबर बाहेरील केक चॉकलेट पेस्ट्री या पदार्थाने देखील आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो. बाहेरील पदार्थाचे सेवन केल्यामुळे आपल्या पोटावरील चरबी जास्त प्रमाणात वाढते. फक्त मैदा आणि तेलानेच आपल्या पोटावरील चरबी वाढते असे नाही तर त्यामध्ये काही व्यक्ती साखरेचे सुद्धा जास्त प्रमाणात वापर करतात त्यामुळे सुद्धा पोटावरील चरबी वाढण्यास मदत होते. गोड पदार्थ खाल्ल्याने सुद्धा पोटावरील चरबी वाढते. त्यामुळे जास्त गोड किंवा जास्त प्रमाणात साखरेचा वापर करणे देखील टाळावे.

चरबी वाढण्यासाठी वेगवेगळी कारणे आहेत. परंतु या लेखांमध्ये आपण काही मुख्य त्याचबरोबर जास्त कोणती पदार्थ आपल्या शरीरावर इफेक्ट करतात हे बघितले आहे. कोणत्या पदार्थामुळे जास्त प्रमाणात चरबी वाढते हे आपण वरीबघितलेले आहे.

चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय

1) गरम पाणी / कोमट पाणी

जर आपल्याला आपल्या पोटावरील चरबी कमी करायचे असेल तर आपण सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी कोमट पाणी पिले पाहिजे. कोमट पाणी पिल्याने कॅलरीज कमी होतील आणि हळूहळू आपल्या पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर जर आपण त्याच कोमट पाण्यामध्ये लिंबू किंवा मध टाकून प्यायला घेतला तर त्याचे अजून चांगले परिणाम आपल्याला बघायला मिळतील. गरम पाण्यामध्ये लिंबू किंवा मग टाकून पिलात तर पोटावरील चरबी कमी होण्यास जास्त मदत होईल.

2) थोड्या प्रमाणात खाणे

आपण पाहतो सध्या प्रत्येक जण हा एक किंवा दोन वेळेला जेवण करत असतो. एक दोन वेळेला पोटभर जेवणापेक्षा तीन-चार वेळेला थोडं थोडं खाल्लेलं आपल्या शरीरासाठी चांगले राहते. एक दोन वेळेला पोटभर जेवल्याने आपल्या पोटावरील चरबी वाढते.त्यामुळे आपण तीन-चार वेळेला थोडे थोडे खाल्ले पाहिजे. तीन-चार वेळा थोड्या प्रमाणात खाल्ल्याने आपल्या पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होईल.

3) पहाटे चालणे

पोटावरील चरबी त्याचबरोबर आपले शरीर नियंत्रणात ठेवायचे असेल तर आपण पहाटे पायी चालणे आपल्या शरीरासाठी योग्य आहे. त्याचबरोबर सकाळी व्यायाम करणे हे सुद्धा आपल्या शरीरासाठी फायद्याचे आहे. सकाळी चालण्याने किंवा व्यायाम केल्याने हळूहळू आपल्या पोटावरील चरबी कमी होईल.

4) रात्री उशिरा जेवण करू नये

रात्री उशिरा जेवण केल्याने पोटावरील चरबी वाढते त्यामुळे रात्री उशिरा जेवण करणे टाळावे. जर रात्री आपण दहा वाजता झोपत असला तर आपले जेवण हे साडेसात आठ वाजता व्हायला पाहिजे. झोपण्याच्या दोन अडीच तास अगोदर जेवण करणे आपल्या शरीरासाठी योग्य आहे. झोपण्याच्या दोन अडीच तास अगोदर जेवण केल्याने आपल्या पोटावरील चरबी तर वाढत नाही त्याचबरोबर त्याने आपले सर्कुलेशन व्यवस्थित राहते. आणि हे आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे.

त्याचबरोबर आपण चरबी कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खावे याबद्दल माहिती पाहू

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये जवसाचे प्रमाण वाढवे. जवस हे आपल्या कमरेच्या भोवती जी चरबी साचते ती कमी करण्यास मदत करते. जवसामध्ये जास्त प्रमाणात फायबर असते.

त्याचबरोबर आपण पाण्याचे प्रमाण वाढवणे देखील गरजेचे आहे. जर पाणी कमी पीत असाल तर आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होते आणि पाण्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे पोटाचा घेर किंवा आकार वाढू लागतो. त्यामुळे आपण जास्त पाणी प्यावे. जास्त म्हणजेच दोन ते अडीच लिटर पाणी आपण दिवसांमध्ये प्यायला पाहिजे. जास्त पाणी पिल्याने शरीरातील असणारे विषारी घटक बाहेर काढणे त्याचबरोबर आपण जास्त खाण्यापासून आपला बचाव होतो आणि पचनक्रिया सुद्धा योग्य पद्धतीने चालते.

वरी आपण चरबी कमी करण्यासाठी चे उपाय बघितलेले आहेत. चरबी कमी करण्यासाठी आपण कोणताही उपाय केला तर तो लगेच लागू होत नाही. म्हणजेच लगेच पोटावरील चरबी कमी करत नाही. पण जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संतुलित आहार त्याचबरोबर पाणी जास्त पिलात तर वजन कमी होऊ शकते. कोणत्याही गोष्टीसाठी थोडा वेळ लागत असतो हे आपण लक्षात घ्यावे.Lathpana Reason And Solution

Sharing Is Caring:

Leave a Comment