Gauri Pujana News: गौरीपूजन या सणाबद्दल सविस्तर माहिती दोन मिनिटात पहा

Gauri Pujana News: नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये एका महत्त्वपूर्ण अशा सणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आपण पाहतो प्रत्येक सण हा दरवर्षी एकदाच येत असतो तसेच गौरी पूजन व ज्येष्ठा गौरी पूजन म्हणून ओळखला जाणारा सण या सणाबद्दल माहिती पाहणार आहोत. गौरीपूजन या सणाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

भाद्रपद महिन्यात येणारा हा सर्वांच्या आवडीचा त्याचबरोबर आनंदाचा सण आहे. या सणाला गौरीपूजन व ज्येष्ठ गौरी पूजन असे म्हटले जाते. या सणाचे विशेष म्हणजेच हा सण तीन दिवसापर्यंत चालू असतो. असे म्हटले जाते की गौराई ह्या माहेराला येत असतात. माहेराला येऊन या गौराई तीन दिवस राहतात या तीनही दिवशी या गौराईंना वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी दिले जातात.

गौरी पूजन व ज्येष्ठा गौरी पूजन या सणाला गौराई या माहेरी येत असतात. गौराई म्हणजेच देवी पार्वतीच होय. या गौराईचे माहेरी येताना मोठ्या उत्साहाने आगमन केले जाते. हा सण सर्वांच्याच आवडीचा सण आहे त्याचबरोबर या सणाला सगळ्यांच्या घरी भरभरून आल्यासारखे वाटते. गौराईचे स्वागत हे कौतुकाने उत्साहाने प्रत्येक घरोघरी केले जाते. हा गौराईचा सण सर्वांच्या आवडीचा आहेच त्याचबरोबर सर्वजण या सणाला खूप उत्सुक व आतुरतेने वाट बघत असतात.

ज्येष्ठा गौरी पूजन हा सण कधी येतो

चला तर मग जाणून घेऊया जेष्ठा गौरी पूजन हा सण नेमका कधी येतो. ज्येष्ठा गौरी पूजन हा सण भाद्रपद महिन्यामध्ये येणारा सण आहे. गणेशाचे आगमन हे भाद्रपद महिन्यामध्ये होत असते. गणेशाचे आगमन झाल्यानंतर हा गौरीचा सण येत असतो. गणेशाच्या आगमनाच्या तीन-चार दिवसानंतरच हा सण येतो. भाद्रपद महिन्यामध्ये येणारा हा सर्वात मोठा सण आहे यालाच ज्येष्ठा गौरी पूजन असे देखील म्हटले जाते. गौरीचे पूजन हे भाद्रपद शुद्ध पक्षाच्या ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते म्हणून त्यांना ज्येष्ठा गौरी म्हणून देखील ओळखले जाते.Gauri Pujana News

ज्येष्ठा गौरी पूजन हा सण किती दिवसाचा असतो ते जाणून घेऊ

या सणाला गौरी गणपतीचा सण असे देखील म्हटले जाते कारण गणपतीचे आगमन झाल्यानंतर लगेचच गौराईंचा हा सण येतो. हा गौराईंचा सण तीन दिवस असतो. गणपतीचा सण जर बघायला गेलो तर गणपती हे गौराईंच्या अगोदर येत असतात आणि नंतर गौराई येतात.

गौराई येण्याच्या अगोदर किंवा आल्याच्या दिवशी प्रत्येक घरोघरी फराळाचं बनवलं जातं. गौराई साठी फराळाचं हे घरोघरी थोडाफार का होईना बनवत असतात. लाडू ,करंज्या आणि शंकरपाळे म्हणजेच फराळाचं होय. हे फराळाचं केल्यानंतर गौराईंच्यासमोर दोन ताटामध्ये भरून ठेवले जाते.

गौराईंचा हा सण तीन दिवसाचा असतो त्यातील पहिला दिवशी गौराईंचे आगमन होते. दुसऱ्या दिवशी पुरणपोळ्या चा स्वयंपाक करून या ज्येष्ठ गौराईंना नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्य दाखवल्यानंतर या ज्येष्ठ गौराईंची आरती करण्यात येते आणि त्यानंतर घरातील सर्वजण तो बनवलेला स्वयंपाक जेवत असतात. तिसऱ्या दिवशी महिला एकमेकांच्या गौराई बघण्यासाठी जात असतात. काही महिला पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी देखील गौराई बघण्यासाठी जातात परंतु जास्त करून तिसऱ्या दिवशी महिला गौराई बघण्यासाठी जातात. असा हा गौराईंचा सण खूप आनंदाचा व उत्साहाचा सण म्हणून ओळखला जातो.

या गौराईच्या सणांची तयारीही आठ दिवस अगोदर पासूनच करतात.गौराईंचे आगमन करण्यासाठी घरोघरी सजावटीसाठी सामान आणतात. छान असं घर सजवून त्यामध्ये नंतर गौराईंचे आगमन केले जाते. काही जणांच्या घरी हा रेडिमेड मकर असतो. तो मकर लावून त्यावरती पडदा लावून नंतर त्यामध्ये जे काही आपल्याकडे सजावटीसाठी असणारे सामान आहे ते लावून त्यामध्ये गौराईंचे आगमन करत असतात. गौराईंचा सण हा आपल्या घरी खरोखरच माहेरी गौराई आल्यासारखा सण आहे. गौराईंचा सण हा सर्वांचा लोकप्रिय सण म्हणून ओळखला जाणारा सण आहे. गौराईंच्या आगमन केल्यानंतर त्यांच्यासमोर आपल्या घरी असणारी खेळणी फुलदाणी अशा वेगवेगळ्या वस्तू ठेवून त्यांचे शोभा वाढवतात. ज्यांच्या घरी जी वस्तू आहे किंवा जी खेळणी किंवा फुलदाणी आहेत त्या ठेवून प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने गौराईंचे आगमन करत असतात. गौराईंचे हे कौतुकाने झालेले आगमन खूपच छान असते.

गौराईचा आगमन करण्यासाठी काही घरांमध्ये मकर सजून त्यामध्ये लाइटिंग देखील लावली जाते. लाइटिंग लावल्यामुळे त्या मकराला अजूनच शोभा वाढते. तीनही दिवस गौराईच्या या मकरासमोर सुंदर अशी रांगोळी काढण्यात येते. आपण आपल्या घरी बनवलेला स्वयंपाकाचे तीन दिवस त्यांना नैवेद्य ठेवत असतो. गौराईला तीन दिवसाची पाहुणी असे देखील म्हटले जाते. गौराई चा हा सण लहान मुलांच्या आवडीचा आहे. लहान मुलांना गणपती आणि गौरी या सणांची खूपच आतुरता असते. गौराईंच्या या मखरामध्ये देखील गणपतीचे आगमन केले जाते.

महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जाणारा हा ज्येष्ठा गौरी आवाहनाचा सण आहे. जो की यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये 10 तारखेला साजरा केला जाणार आहे. या ज्येष्ठा गौरी आवाहनाचा सणाची सुरुवात ही 10 सप्टेंबरला होते. 10 सप्टेंबर पासून 12 सप्टेंबर पर्यंत हा सण असतो. या तीन दिवसाच्या दरम्यान घरामध्ये गौराई यांची मूर्ती आणली जाते त्याबरोबर त्या मूर्तीचे पूजन करण्यात येते.

भाद्रपद महिन्यामध्ये येणारा हा गौरी गणपतीचा सण आहे. भाद्रपद महिन्यात गणपतीच्या पाठोपाठच येणारा हा ज्येष्ठा गौरीचा सण आहे. गणपतीच्या पाठोपाठच ज्येष्ठा गौरीचे आगमन होत असते. महाराष्ट्रामध्ये गणपती सोबतच ज्येष्ठा गौरीचा सण देखील मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहाने आणि कौतुकाने साजरा करण्यात येतो. तसेच यावर्षी देखील गौरी गणपतीचा सण हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. यावर्षी गौराईंच्या आगमन हे मंगळवारच्या दिवशी होते. मंगळवारी म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरींचे आगमन होईल आणि 11 सप्टेंबर म्हणजेच बुधवारी या ज्येष्ठा गौरीचे पूजन करण्यात येईल. ज्येष्ठा गौरीचे पूजन हे सायंकाळी असते. या ज्येष्ठा गौरीच्या पूजनाची तयारी दुपारून केली जाते. सायंकाळी ज्येष्ठा गौरी नैवेद्य दाखवून आरती म्हणून हे ज्येष्ठा गौरी पूजन करण्यात येते.

ज्येष्ठा गौरी निमित्त आपण आपल्या मित्र-मैत्रिणींना खास शुभेच्छा देखील पाठवत असतो. आता तर सर्वजण मोबाईल वरती आपण आपल्या ज्येष्ठा गौरीचे फोटो काढून देखील टाकतात. त्याचबरोबर शुभेच्छा देखील मोबाईलवर दिल्या जातात. गौराईचा हा सण येण्याअगोदर पासूनच गौराई येण्याची उत्सुकता सर्वांना लागलेली असते.

ज्येष्ठ गौरी पूजनाच्या दिवशी आपल्या घरातील अंगणापासून ज्या ठिकाणी आपण गौराईचे आगमन केलेले आहे तिथपर्यंत पावले उमटले जाते. त्याचबरोबर अंगणापासून गौराईपर्यंत कुंकवाचे हाताचे ठसे देखील उमटवले जाते. म्हणजेच ज्येष्ठा गौरी पूजेच्या दिवशी घरामध्ये गौराईच्या समोर रांगोळी त्याचबरोबर अंगणात तुळशी समोर देखील रांगोळी काढून तुळशी पासून गौराई पर्यंत हळदीकुंकवाचे हाताचे ठसे त्याचबरोबर पाऊले उमटवले जातात. त्यानंतर गौराई समोर समई मध्ये सात सात वाती लावून दिवे देखील लावले जातात. त्याचबरोबर कणकीचे दिवे बनवण्याची पद्धत देखील आहे. कणकीचे दिवे बनवून त्यामध्ये देखील दिवे लावतात.

त्यानंतर केळीच्या पानावरती गौराई नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर जेष्ठा गौरीचे पूजन केले जाते. नंतर गौराईची म्हणजेच महालक्ष्मीची आरती म्हणतात. अशा या गौराई तीन दिवसासाठी माहेरी येत असतात. खरं पाहिलं तर गौराई दीड दिवसाची पाहुणे असे देखील म्हटले जाते. हा भाद्रपद महिन्यामध्ये येणारा मोठा त्याचबरोबर सर्वांच्या आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. या सणाला सर्वांच्या घरामध्ये खूप भरभरून आल्यासारखे वाटते.

गौराईच्या या आगमनानंतर तीन दिवस सर्वांच्या घरामध्ये खूप धावपळ असते त्याचबरोबर सर्वांना मनापासून खूप आनंद वाटत असतो. हा सण असा आहे या सणामुळे संपूर्ण कुटुंबाला आनंद होतो. असा हा गौराईंचा सण तीन दिवसांमध्ये साजरा केला जातो. हा सण महाराष्ट्रात सगळीकडेच मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.Gauri Pujana News

Sharing Is Caring:

Leave a Comment