Potachi Samasya: नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये आपल्या शरीराबद्दल म्हणजेच आपल्या आरोग्य विषयी येणाऱ्या अडचणीबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. सध्याच्या या धावपळीच्या काळामध्ये सर्वांचे लक्ष हे आपापल्या कामाकडे वेधलेले आहे त्यामुळे आपल्या आरोग्याकडे कोणीही जास्त लक्ष देत नाही त्यामुळे आरोग्यावर होणारे परिणाम हे जास्तीत जास्त वाढत चाललेले बघायला मिळतात. सध्याच्या या काळामध्ये बऱ्याच जणांना जास्त प्रॉब्लेम हा पोटाचा व तब्येतीचा आहे. तर अशा या अडचणींवरती आपण कोणत्या उपाय करू शकतो याबद्दल या लेखांमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. जर आपल्याला देखील आपल्या आरोग्य विषयी किंवा आपल्या आरोग्यावर होणारे परिणाम वरती उपाय जाणून घ्यायचे असतील तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
आपण पाहतो सध्याच्या या काळामध्ये बऱ्याच जणांच्या पोटाच्या तक्रारी ह्या वाढताना दिसतात. पोटाच्या तक्रारी वाढत चाललेल्या आहेत परंतु त्यावरती उपाय कोणते आहेत हे आपल्याला माहीत नसल्याकारणाने आपण लगेचच हॉस्पिटलला जात आहोत. हॉस्पिटल ला जाऊन देखील आपल्याला जसा पाहिजे तसा फरक जाणवत नाही. हॉस्पिटलमध्ये फरक पडतो परंतु जोपर्यंत गोळ्या औषधाचा पावर आहे तोपर्यंत जास्त पडतो आणि नंतर परत आपल्याला आपल्या पोटाच्या तक्रारी जाणवतात. आपण या लेखांमध्ये जाणून घेऊ पोटाच्या तक्रारी वरती म्हणजेच पोट साफ करण्यासाठी कोणते उपाय फायदेशीर ठरतील. तसं तर हॉस्पिटलमध्ये देखील सर्व आजारांवरती फरक पडतच असतो परंतु काही जणांकडे पैशाची अडचण असल्याकारणाने सर्वजण लगेचच हॉस्पिटलला जाऊ शकत नाहीत त्यामुळे काही कुटुंबातील व्यक्ती हे घरगुती उपाय देखील करत असतात.
पोट साफ करण्यासाठीचे उपाय
पोट साफ करण्यासाठी आपण रोज जेवल्यानंतर जी दालचिनी असते ती मदत मिसळून घेतली पाहिजे. दालचिनीची पावडर मधात मिसळून घेतल्याने आपली पोटाची तक्रार कमी होईल. असे आपण रोज जेवणानंतर केले पाहिजे.
पोटाच्या तक्रारी वरती दुसरा उपाय तो म्हणजेच एक चमचा मेथीचे दाणे 100 मिलि पाण्यात टाकावे. आणि ते पाणी उकळून घ्यावे. उकळून घेतलेले पाणी जेवणाअगोदर प्यावे. मेथीचे दाणे टाकून उकळून घेतलेली पाणी पिल्यानंतर एक तासाने जेवण करावे. व जेवल्यानंतर मेथीचे दाणे चावून खाल्ले पाहिजे. जेवल्यानंतर मेथीचे दाणे चावल्याने सकाळी पोट साफ होते. हा उपाय पोटाच्या समस्येसाठी फायदेशीर ठरेल.
पोटाची तक्रार असेल तर जेवण केल्यानंतर जी भाजलेली जिरे पूड असते ती पाण्यासोबत घेतल्यानंतर ती तक्रार कमी होते. भाजलेली जिरेपूड पाण्यासोबत घेतल्यामुळे जी आपल्याला पोटाची समस्या आहे त्या समस्येपासून आपल्याला बरे वाटेल. Potachi Samasya
पोटाचा जर त्रास होत असेल किंवा पोट साफ होत नसेल तर झोपण्याच्या अगोदर आपण दुधामध्ये म्हणू का टाकून ते दूध उकळून घ्यावे. आणि रात्री झोपण्या अगोदर ते उकळून घेतलेले दूध प्यावे व मनुका चावून खावे.
पोट साफ करण्यासाठी आणखी एक नवीन उपाय आहे तो म्हणजेच गुलकंद खाणे. गुलकंद नेमकं कधी खायचे हा प्रश्न आपल्याला पडला असेल. गुलकंद हा रात्री झोपण्या अगोदर एक चमचा भरून खायचा. एक चमचाभर गुलकंद खाल्ल्यानंतर त्यावरून एक कप दूध प्यावे. असे केल्याने आपली पोटाची समस्या दूर होईल.
आपण या लेखांमध्ये पोट साफ करण्याचे उपाय पाहत आहोत त्यातीलच एक उपाय म्हणजेच अंजीर जे असतात ते दुधा मध्ये दोन-तीन टाकावे आणि ते दूध उकळून घ्यावे आणि त्यातील दोन-तीन अंजीर खावे आणि नंतर वरून दूध पिले पाहिजे.
पोटाच्या समस्येपासून सुटका मिळवायचे असेल तर कोरफडीचा जो गर असतो तो गर एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे गर टाकायचा आणि नंतर ते प्यावे. असे केल्याने देखील आपल्या पोटाच्या तक्रारी दूर होतील.
पोटाची समस्या ही अनेक जणांना निर्माण होत आहे आणि या समस्येपासून आराम मिळवायचा असल्यास हा उपाय करून पहा. एक कप पाणी घ्यायचे त्या पाण्यामध्ये एक ते दोन चमचे साजूक तूप टाकावे त्याचबरोबर त्यामध्ये थोडे सेंधव मीठ टाकावे. सेंधव मीठ हे थोडेच टाकावे. आणि हे मिश्रण रात्री झोपण्याच्या अगोदर प्यायचे. हे मिश्रण पिल्याने सकाळी पोट साफ होण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर जर आपल्याला या उपायाने पोटाच्या तक्रारी दूर होत नसतील तर आपण दररोज सकाळी साजूक तुपा सोबत दोन खजूर खाल्ल्या तरीसुद्धा आपली पोट साफ होण्यासाठी मदत होईल. पोट साफ होण्यासाठी या लेखामध्ये भरपूर असे उपाय सांगण्यात आलेले आहेत. यापैकी आपण कोणत्याही उपाय करून आपल्या पोटाच्या समस्येपासून नियंत्रण मिळू शकता. पोटाची समस्या असेल तर आपल्याला दुसऱ्या कोणत्याही कामांमध्ये मन लागत नाही त्यामुळे सर्वप्रथम आपण आपली समस्या दूर करावी. कितीही काम असले तरीसुद्धा आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे तेवढेच गरजेचे असते.
जर आपले पोट साफ होत नसेल तर आपण झोपण्या अगोदर एक चमचा भरून ओवा खाल्ला पाहिजे. जर रोज रात्री एक चमचा ओवा झोपण्या अगोदर खाल्ला तर त्याने आपले पोट साफ होण्यासाठी मदत होईल. आणि आपली पोटाच्या समस्येपासून सुटका होईल. दिवसेंदिवस पोटाची समस्या ही वाढत चाललेली दिसत आहे कारण आपण जेवण केल्यानंतर एका जागी बसून राहतो. सध्या बऱ्याच जणांचे काम हे एका जागेवर बसून असते त्यामुळे देखील हा पोटाचा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. या पोटाच्या समस्या वरती अजून एक नवीन उपाय आहे तो म्हणजेच आपल्या दारासमोर कोरफडीचे झाड असते किंवा दुसऱ्याच्या इथून आपण कोरफड आणली आणि ती ताजी कोरफड कमी गॅसवर भाजावी. कोरफड भाजल्यानंतर त्याचे साल काढून घ्यावे. साल काढल्यानंतर मध्ये जो गर राहतो तो गर मलमलच्या कपड्यात गाळून घ्यावा. आणि त्या घरामध्ये थोडा मध मिसळावा. हे मिश्रण खाल्ल्याने देखील आपले पोट सकाळी साफ होण्यासाठी मदत होते.
पोटाच्या समस्येपासून दूर राहायचे असेल तर आपण रात्रीच्या वेळी म्हणजेच रात्री झोपण्या अगोदर एक चमचा भरून एरंडेल तेल घ्यावे. रात्री झोपण्यापूर्वी एरंडेल तेल पिल्याने देखील आपली पोट साफ होण्यासाठी मदत होईल. दिवसेंदिवस ही पोटाची समस्या वाढत चाललेली बघायला मिळते. पोटाच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी या लेखांमध्ये अनेक असे उपाय सांगण्यात आलेले आहेत हे उपाय आपण आपल्या इच्छेनुसार करू शकतात. या उपायांपासून सर्वांनाच फरक होईल असे नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याअगोदर आपल्याला ते मिश्रण किंवा ती खाद्य वस्तू सहन होईल का नाही याचा विचार करावा. कोणताही उपाय केल्यानंतर आपल्याला तो सहन झाला तरच डबल करावा नाहीतर त्या खाद्य वस्तूमुळे देखील आपले पोट बिघडता कामा नये. तसं पाहिलं तर या सर्व उपायांमुळे आपल्या पोटाच्या समस्येपासून आपल्याला सुटका मिळेल परंतु एकदम खात्रीशीरपणे आपण सांगू शकत नाही की फरकच पडेल म्हणून. त्यामुळे कोणताही उपाय करत असताना आपण जाणीवपूर्वक करावा.
पोटाच्या समस्येपासून आराम मिळवायचा असल्यास आपल्याला जेवण केल्यानंतर थोडे चालणे देखील गरजेचे आहे. आपण जेवण केल्यानंतर लगेच झोपतो किंवा बसून आपल्या कामात सुरुवात करतो त्यामुळे देखील पोटाची समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसते. पोट साफ होत नाही हे एक समस्या आहे परंतु अजून अशा अनेक समस्या वाढताना आपल्याला दिसून येतात. सध्याच्या या काळामध्ये प्रत्येक व्यक्ती ही खूप व्यस्त आहे ती व्यक्ती आपल्या आरोग्याकडे म्हणजेच शरीराकडे जेवढे लक्ष केंद्रित करायला पाहिजे तेवढे लक्ष केंद्रित करत नाही त्यामुळे हळूहळू आरोग्यावरती वेगवेगळे परिणाम होता ना दिसतात. सर्वांनी आपले काम करावे परंतु काम करत असताना देखील आपल्या आरोग्याकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. जर आपण आपल्या आरोग्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर ते नंतर सुधारण्यास वेळ लागतो. वेळीच आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष दिल्याने ते लवकर बरे होते. Potachi Samasya