Bhagavangad sampurn mahiti: भगवान गडाबद्दल संपूर्ण माहिती

Bhagavangad sampurn mahiti: भगवान गडाबद्दल संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो आपण या लेखांमध्ये खूप फायदेशीर त्याचबरोबर आपण सर्वांनी ऐकलेल्या भगवानगडांबद्दल माहिती पाहणार आहोत. जर आपल्याला भगवानगडाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा लेख पूर्ण वाचा. या लेखांमध्ये भगवान गडाची निर्मिती कशी झाली, हा गड बांधण्यासाठी किती लोकांनी मदत केली, त्याचबरोबर हा गड बांधण्यामागे सर्वात मोठा हिस्सा कोणाचा आहे याबद्दल माहिती बघूया.

भगवानगड हे गाव महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. भगवान गडालाच श्री क्षेत्र भगवानगड असेही म्हणले जाते. हा गड बांधण्यासाठी भगवान बाबांनी त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी खूप मदत केली. म्हणून आज हा भगवानगड एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखला जाऊ लागला. सुरुवातीला भगवान गडाचे बांधकाम थोडेच होते परंतु आता या भगवानगडाची खूप मोठी सुधारणा झालेली आहे. या ठिकाणी भरपूर मोठे झाडे लावण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी विठ्ठल व पांडुरंगाची मूर्ती देखील आहे. भगवानगडावरील वातावरण हे एकदम फ्रेश आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण त्या सर्व आजूबाजूच्या गोष्टींमध्ये खूप रमून जातो. हे ठिकाण खरंच पाहण्यासारखे आहे. भगवानगड हे एका गावाच्या बाजूला डोंगरावरती आहे. त्या गावाचे नाव खरवंडी आहे. भगवानगड हे खरवंडी गावाच्या बाजूला वसलेले आहे. खरवंडी हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील आहे. श्री क्षेत्र भगवानगड अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात आहे.

भगवान गडाची बांधणी करत असताना भरपूर लोकांनी त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या मर्जीने काम करणारे भक्तगण भेटले. त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनी सुद्धा हे भगवानगड घालत असताना वेगवेगळ्या प्रकारांमार्फत मदत केली. काही काही लोकांनी तर आपापल्या घरून भाकरी भाजी आणून त्या ठिकाणी काम करणाऱ्यांसोबत खाऊन ते काम रात्रंदिवस चालूच ठेवले. आणि लवकरात लवकर भगवान गडाची बांधणी निर्माण केली. सर्वांनी हे भगवानगड बांधत असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली आपल्याला ऐकायला भेटते. फक्त पुरुषांनीच नाही तर स्त्रियांनी देखील हे भगवानगड बांधण्यासाठी मदत केलेली आहे.

 

भगवान गडाची बांधणी ही सर्व लोक एकजुटीने राहावे, त्याचबरोबर कोणत्याही जातीमध्ये जातीभेद नसावा. सर्व जाती-धर्मामध्ये एकोप्याने राहण्याची भावना असावी त्यामुळे उभा करण्यात आला आहे. भगवान गडावर जातीभेद केला जात नाही जो योग्य आहे त्यासाठी त्या ठिकाणी योग्य ती जागा मिळते. आपल्या सर्वांना माहित आहे महाराष्ट्र राज्यांना ऊस तोडीचे राज्य म्हणून ओळखले जाते. भगवान गडाकडे महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या ऊसतोड मंजुराचे एक श्रद्धास्थान म्हणून देखील बघितले जाते. भगवानगड हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.

भगवान गडावर गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला निसर्गरम्य वातावरण बघायला मिळते. त्या ठिकाणी भगवान बाबांनी वापरलेल्या वस्तूंचा संग्रहालय देखील आहे त्या संग्रहालयामध्ये त्यांनी वापरलेल्या सर्व वस्तू जपून ठेवलेल्या आहेत. त्या सुद्धा आपल्याला तिथे गेल्यानंतर बघायला मिळतात. एक मुख्य म्हणजे भगवानगडावरती प्रसादालय आहे त्या ठिकाणी आपण कधीही गेलात तरी सुद्धा आपल्याला प्रसाद दिला जातो. प्रसादाची व्यवस्था ही खूप छान त्याचबरोबर सिस्टिमॅटिक आहे. भगवान गडावर ती पाण्याची देखील सोय केली गेलेली आहे. श्री क्षेत्र भगवानगडावरील जे मोकळे अंगण आहे ते देखील अतिशय स्वच्छ आहे. भगवानगडावरती खूप स्वच्छता राखली जाते.Bhagavangad sampurn mahiti

भगवान गडावर बघण्यासारखे विठ्ठल व पांडवाचे मंदिर आहे. त्याचबरोबर आपण विठ्ठल व पांडवांचे दर्शन घेतल्यानंतर खाली जाण्यासाठी पायऱ्याचा रस्ता आहे आणि खाली तळ भागांमध्ये भगवान बाबा जनार्दन स्वामी आणि भीमसिंह महाराज यांच्या समाध्या देखील तेथे आहेत. भगवान गडावरती पाठीमागच्या भागाला खूप मोठी मोठी दगडे आहेत जी की आपण कधीच बघितलेली नसतील.

श्री क्षेत्र भगवानगड हा संत भगवान बाबा यांनी बांधलेला आहे. हे संत भगवान बाबा वंजारी समाजाचे आहेत. परंतु भगवानगडावरती जाती भेद केला जात नाही. भगवान बाबा हे वारकरी संप्रदायांचे संत होते.

भगवान गडावर कोण कोण गादीवर बसवीलेले आहेत. पहिले कोण गादीवर बसलेले होते आणि त्यानंतर कोण बसले हे बघूया

भगवान बाबांचे निधन झाल्यानंतर गादीवर भीमसिंह महाराज बसवण्यात आले. भीमसिंह महाराज हे राजपूत समाजाचे संत आहेत. भगवानगडावरती पहिले भगवान बाबा गादीवर बसलेले होते आणि त्यानंतर भीमसिंह महाराज गादीवर बसविले. भीमसिंह महाराजांनंतर श्री डॉ.नामदेव महाराज शास्त्री नदीवर बसलेले आहेत. हे वंजारी समाजाच्या आहेत. हे होते भगवान गडावर गादीवर बसलेले महंत.

भगवानगड व भगवानगड चा परिसर हा खरोखरच बघण्यासारखा आहे तिथे गेल्यानंतर माणसाचे मन खूप तिथल्या वातावरणामध्ये रमते. त्या ठिकाणी भरपूर नारळाची झाडे त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावलेली आहेत ते झाले आता खूप मोठमोठे झालेले आहेत. त्या ठिकाणी भरपूर मोठे झाडे देखील आहेत. जर आपण कधी उन्हाळ्यामध्ये गेलो तर आपल्याला त्या झाडाच्या सावलीमध्ये देखील बसण्याचा आनंद घेता येईल एवढे मोठे झाड आहेत. त्याचबरोबर बसण्याची सुविधा बाकी ठिकाणी सुद्धा केलेली आहे. भगवान गडावरती भगवान बाबांच्या खूप साऱ्या आठवणी त्या ठिकाणी आहेत.

भगवान गडावरती मोठ्या प्रमाणात गर्दी श्रावण महिन्यामध्ये असते. श्रावण महिन्यामध्ये खूप लोक या गडांवरती गर्दी करतात. जर श्रावण महिन्यामध्ये सुद्धा जास्त गर्दी बघायला गेलं तर ती सोमवारी असते कारण श्रावण सोमवारी भरपूर लोक येत असतात.

भगवानगडावरती दसऱ्याला सुद्धा खूप गर्दी बघायला मिळते. दसरा हा एक सण आहे त्या सणाला विजयादशमी देखील म्हणतात. या दिवशी या गडावरती खूप लोक येत असतात. सर्व जे लोक आहेत त्या लोकांमध्ये जाती बद्दल काहीही घेत मनात न ठेवता सर्व जाती धर्मातील जे लोक आहेत त्या लोकांनी एकत्रितपणे राहावे म्हणून एक भक्तीचा गड म्हणजेच श्रीक्षेत्र भगवानगड या गडाची उभारणी झालेली आहे. एकादशी किंवा कार्तिकी पौर्णिमा ला देखील या ठिकाणी चा उत्सव चालू होतो. विजयादशमीच्या दिवशी या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा बघायला मिळतात ते म्हणजेच विजयादशमीच्या संबंधित असणारे.

आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न पडला असेल की भगवानगडावरती विजयादशमीला उत्सव का साजरा केला जातो तर तो का केला जातो ते पाहूया.

विजयादशमीला सर्व लहान मोठे व्यक्ती एकत्र येतात त्याचबरोबर ते व्यक्ती एकमेकांशी दोन-चार शब्द बोलतात. लहान व्यक्ती मोठ्या माणसाच्या पाया देखील पडतात. जे खेड्यापाड्या राहणारे लोक आहेत ते लोक विजयादशमीच्या दिवशी एकमेकांच्या घरी देखील जात असतात तसेच ज्यांना शक्य आहे ते भगवानगडावरती जातात. त्यादिवशी ते त्या ठिकाणी एकमेकांच्या विचारांची देवाण-घेवाण करतील हा उद्देश होता. एकमेकांचे सुख दुःख याबद्दल देखील जाणून घेतील. त्यामुळे विजयादशमीला भगवानगडावरती उत्साह साजरा केला जातो. विजयादशमीच्या दिवशी या भगवानगडावरती खूप गर्दी असते महाराष्ट्रा मधून कानाकोपऱ्यामधून मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या जाती धर्माचे भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. त्याचबरोबर विजयादशमीच्या दिवशी भगवानगडावर सीमोल्लंघन उत्सव साजरा केला जातो. हे पाहण्यासाठी सुद्धा भरपूर गर्दी झालेले असते.

भगवान गडावरील वातावरण हे निसर्गरम्य त्याच बरोबर स्वच्छ आहे. भगवान गडावर गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला मारुती रायचे मंदिर. मारुतीरायाचे दर्शन घेऊन अंतर आपण भगवान बाबा च्या समाधीचे दर्शन घ्यायला जातो. भगवान बाबाची समाधी ही खाली तळघरात आहे. तर घरामध्ये एक आपल्याला असे मंदिर बघायला मिळते की ते पूर्ण दगडाने बनलेले आहे. भगवानगडावर आल्यानंतर आपल्याला एक ऐतिहासिक ठिकाणी आल्यासारखे वाटते. भवानगड हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते या ठिकाणी हजारो लोक विजयादशमीच्या वेळी दर्शनासाठी येत असतात. भगवान गडावरील प्रसादालय हे देखील खूप मोठे आहे त्या ठिकाणी एका वेळेला 800 ते 900 लोक सोबत बसू शकतात. खरंच भगवानगड हे एक बघण्यासारखे ठिकाण आहे त्या ठिकाणी आल्यानंतर खूप प्रसन्न वाटते.

खरवंडी गावाच्या बाजूला वसलेल्या भगवान गडाबद्दल संपूर्ण माहिती या लेखांमध्ये बघितलेली आहे. भवानगड हे एक जागृत त्याचबरोबर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील एक ठिकाण आहे. या ठिकाणी प्रसादालय देखील उपलब्ध आहे. खरंच या ठिकाणी नक्की एकदा भेट देऊन पहा खरोखरच हे ठिकाण खूप छान आहे.Bhagavangad sampurn mahiti

Sharing Is Caring:

Leave a Comment