Papai Lagavad And Bajarapetha Mahiti: पपई लागवड आणि बाजारपेठ माहिती

Papai Lagavad And Bajarapetha Mahiti: नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये पपई लागवड आणि बाजारपेठ याबद्दल माहिती पाहणार आहोत. सर्वसाधारण भारतामध्ये 12 महिने पपईचे पीक घेतले जाते परंतु लागवड मात्र ऑक्टोबर महिन्यापर्यंत केले जाते वर्षभरामध्ये जून, जुलै, सप्टेंबर ,ऑक्टोंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या तिन्ही हंगामामध्ये पपईची लागवड केली जाते.

पपई लागवडीसाठी योग्य जमीन निवडणे आवश्यक आहे. पपई लागवडीसाठी जमीन ही पाण्याचा निचरा होणारी आणि असणे गरजेचे आहे. लाल माती आणि खडकाळ जमिनीमध्ये पपईचे पीक येत नाही कारण पपईचे मुळे हे दोन ते तीन अडीच फूट खोल जात असत  लाल मातीमध्ये किंवा खडकाळ जमिनीमध्ये ही मुळे ही खोल जात नाहीत म्हणून पपई लागवडीसाठी जमीन निवडताना काळजी घेणे आवश्यक आहे.

पपई लागवडीसाठी जमीन निवडल्यानंतर खोल नांगर करावी आणि दहा ते पंधरा ट्रेलर खत जमिनीत टाकावे. आणि जमीन भुसभुशीत करून घ्यावी त्यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होईल.

पपई लागवडीसाठी हवामान.

पपई साठी उष्ण हवामान खूप वारे आणि कडाक्याची थंडी असे हवामान अजिबात योग्य नाही. पपई लागवडीसाठी जास्तीत जास्त 15 ते 30 अंश सेल्स हवामान आवश्यक आहे पाऊस एक हजार पाचशे मिनी पेक्षा जास्त नसावा तापमान हे 44 अंश पेक्षा जास्त नसावे अशा पद्धतीने हवामान असल्यास  पोषक ठरते आणि पपई हे पीक ते सहन देखील करू शकते…

रोप तयार करणे .

पपई लागवडीसाठी रोप तयार करणे ही सर्वात मोठी आणि काळजी करून करणारी गोष्ट आहे. पपईचे रोप तयार करण्यासाठी  हेक्टर साठी जवळजवळ 250 ते 300 ग्रॅम बियाणे लागते. तयार केलेले बियांची किंवा रोपांची लागवड केल्यानंतर रोपांची वाढ होऊन चांगली होण्यासाठी त्यांना चांगले झाकून ठेवावे पाणी एकदम शांत पद्धतीने द्यावी लागवडीसाठी योग्य प्रकारे रोप तयार होण्यासाठी पपईंच्या रोपांसाठी सहा ते सात आठवड्याचा कालावधी लागतो. पपईची बी  करण्यासाठी योग्य पपईच्या बियांच्या जातींचा उपयोग करणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला चांगल्या कृषी माहिती आहे अशा व्यक्तींची भेट घ्यावी लागेल त्यानंतरच पपई साठी बियाणे खरेदी करावे.

महाराष्ट्र मध्ये सर्वसाधारण शेतकरी पपई उत्पादक पपई लागवड करताना भारतामध्ये वर्षभरामध्ये प्रमुख्याने जून. जुलै,, सप्टेंबर, ऑक्टोंबर आणि जानेवारी फेब्रुवारी या महिन्यांमध्ये पपईची लागवड करतो. या महिन्यांमध्ये लागवड केल्यामुळे पपई चांगली येते व उत्पादन देखील चांगले मिळते.Papai Lagavad And Bajarapetha Mahiti

पपई पिकामध्ये नर आणि मादी अशी स्वतंत्र झाडे असतात त्यामुळे शेतकऱ्यांची खूप अडचण होते. ते ओळखण्यासाठी झाडे ला फुले येऊन द्यावा लागतात किंवा फुले आल्या शिवाय ती ओळखू येत नाहीत. फुले आल्यानंतर ती झाडे उपटून व्यवस्थित बांधाच्या कडेला टाकून द्यावीत. बागेमध्ये झाडे वेगवेगळे असल्यास दहा टक्के नर झाडे विखुरलेल्या स्वरूपामध्ये असावी उभयलिंगी पपईच्या जातीची लागवड केल्यास प्रत्येक लागवडीत एकच रोप लावावे.

पपई लागवड पद्धत

पपई लागवड पद्धत करण्यासाठी सर्वप्रथम जमिनीची नांगरट करणे गरजेचे आहे. नांगरणी केल्यानंतर चार-पाच बैल पाळ्या ट**** आवश्यक आहे. जमीन एकदम भूसभुशीत केल्याशिवाय लागवड करू नये. जमीन भुसभुशी झाल्यानंतर वीस ते पंचवीस बैलगाड्या हेक्टरी शेणखत वापरावे .सर्वसाधारण दहा टन जमिनीत मिसळून घ्यावे.

पाणी व्यवस्थापन

पपई बागेत पाणी देण्यासाठी हिवाळ्यामध्ये सर्व साधारणपणे दहा दिवसांनी पाणी देणे गरजेचे आहे उन्हाळ्यामध्ये आठवड्या मधून एकदा पाणी देणे गरजेचे आहे दुहेरी अळी पद्धत असल्यास ठिबक सिंचन चा वापर केला जातो. ठिबक सिंचन मुळे बागेमध्ये पाणी व्यवस्थित दिले जाते आणि ते जास्त फायद्याचे असते.

आंतरमशागत

पपई बागेमध्ये अंतर मशागत खूप महत्त्वाचे आहे ..कारण मशागत चांगले नसेल तर पपईच्या झाडांची वाढ व्यवस्थित होणार नाही त्यामुळे अंतर मशागत एकदम चांगली ठेवावी. बागेला व्यवस्थित खुरपून घ्यावी बागेचे खरेदी करावी फुले आल्यावर दहा टक्के नर झाडे आहेत ते काढून टाकावेत. फळांची दाटी झाल्यास त्याची विरळणीकरावी. मुख्य खोडास येणारी फूट लागलीच काढावी दर दोन महिन्यांनी बाग खोदण्यास. स्वच्छ करण्यास विसरू नये.

फळांची काढणी

फळांची काढणी सर्वसाधारणपणे पपईची रोपे लागवडीपासून 3 ते 7 शेतकऱ्यांना पपईचे पीक कसे काढले जाते हे माहीत नसते त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन पीक काढणे गरजेचे आहे.. त्यासाठी आपल्याला पपईच्या झाडांचे योग्य निरीक्षण करणे गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे पपईचे रोप लागवडीपासून तीन ते सात महिन्यांनी फुले येतात. व त्यानंतर फळे काढण्यासाठी चार महिन्याचा कालावधी लागतो.  त्यानंतर काढण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागतो सालीतील चीक दुधासारखा न निघता पाण्यासारखा निघतो पपईंच्या फळावर डोळा पडला म्हणजे पपई झाडावरून काढण्यास योग्य आहे असे समजले जाते.

पपईवर पडणारे रोग व त्यावरील उपाय .

मित्रांनो पपईवर पपया रिंग स्पॉट किंवा पपया मो किंवा केवडा हा विषाणूइतका खतरनाक इतका खतरनाक आहे की आपली सर्व बाग गोष्ट करू शकतो..या रोगाच्या प्रसारामुळे पपईच्या झाडावरील नवीन येणारी पालवी पिवळसर दिसते व वाढीच्या काळामध्ये पानांच्या शिरा पिवळसर दिसतात . पपईची पाने आखडून जातात पाण्यात लागतात .पानावर पिवळे चट्टे पडतात रोगाचा त्रास  तीव्र असल्यामुळे पानाचा आकार कमी होऊन एखाद्या धाक्याप्रमाणे ही पाने दिसतात. अशा रोगावर रोगग्रस्त झाडाचे फळे आकाराने लहान व वेळी वाकडे येतात त्यामुळे उत्पादनामध्ये लक्षणीय घट होते.  पपईवरील विषाणूजन्य रोग झाडावर आल्यास त्याला नियंत्रण करणे कठीण जाते शक्यतो नियंत्रणात देखील नाही. म्हणून ही रोग पडलेली झाडे उपटून शेतांच्या बाहेर करून टाकावीत त्यामुळे दुसरा झाडांना त्याचे बाद होणार नाही.Papai Lagavad And Bajarapetha Mahiti

उपाय

त्यासाठी शेतकऱ्यांनी रोगप्रतिकारक अथवा कमी रोगांना बळी पडणाऱ्या जातीची पपईची लागवड करावी. विसरूजन्य रोगाचा प्रसार मावा किडीमुळे होतो म्हणून मावा कीड नियंत्रणासाठी रोपवाटिकेतील झाडे निरीक्षण करून काळजी घेऊ घेऊन आणावीत. मावा किडीचा प्रादुर्भाव दिसताच15 दिवसाच्या अंतराने फवारणी करणे गरजेचे आहे. पपईच्या बागेमध्ये मावा किडीचा शिरकाव टाळण्यासाठी बागेभोवती उंच पीक लावून त्याच्यावर नियंत्रणात आणू शकता .त्यामुळे बाहेरून येणारा रोग उंच झाडावर अडकून पपईच्या झाडांना कमी त्रास देईल किंवा त्या विषाणूजन्य रोगाचा प्रसार कमी होतो.

खोडखूज किंवा बुंधासळ हा रोग बुरशी पासून तयार होतो.झाडाचा बुंधा काळा पडून तो भाग मऊ होतो पपईच्या खोडाला जास्त पाणी लागल्याने बुंधा सोडतो. त्यामुळे पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीतच पपईची लागवड करावी. बुडाला पाणी लागू देऊ नये म्हणजे दुहेरी बांगडी पद्धतीने पाणी द्यावे बागेत जास्त वेळ पाणी साचू देऊ नये.

पपईच्या व्यावसायिक लागवडीतून शेतकऱ्यांची समृद्धी अर्थात बाजारपेठ.

भारतातील पपई लागवडीसाठी हवामान एकदम वातावरण खोलीत आहे त्यामुळे खूप राज्यांमध्ये पपईची लागवड केली जाते आणि जागतिक बाजारपेठेमध्ये त्याला चांगला दर देखील मिळतो 2002 सालच्या कृषी संघटनेच्या अहवालानुसार जागतिक स्तरावर अडतीस टक्के उत्पन्नास भारत हा जगातील सर्वात मोठा पपई उत्पादक देश ठरला आहे भारतामध्ये, प्रामुख्याने आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल, कर्नाटक,, गुजरात महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्य प्रदेश, बिहार, पपईची लागवड केली जाते.

भारतामध्ये पपईची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे पपईचे निर्यात देखील खूप वाढले आहे आणि शेतकरी देखील आर्थिक दृष्ट्या संपन्न होत आहे. त्याचबरोबर शेतकरी किरकोळ बाजारात पपई पिकाची विक्री करून देखील चांगल्या प्रमाणात नफा कमवू शकतात. सध्या पपईचे बाजारभाव हे जिल्हास्तरीय प्रति किलो 40 ते 50 रुपये रुपये आहेत. त्याचबरोबर अनेक शेतकरी या बाजार समितीत पपई पिकाची विक्री न करता किरकोळ बाजारात म्हणजेच गावस्तरीय बाजारात पपईची विक्री करतात. आणि सध्या पपईची किरकोळ बाजारात किंमत ही ६० रुपये किलो ते 70 रुपये किलो आहे. यामुळे शेतकरी किरकोळ बाजारात पपई पिकाची विक्री करून मोठा नफा कमवत आहेत. Papai Lagavad And Bajarapetha Mahiti

Sharing Is Caring:

Leave a Comment