Bharat Srakiar 10 Yojana: भारत सरकारच्या दहा लोकप्रिय योजना
नमस्कार मित्रांनो भारत सरकारने अनेक योजना आणल्या आहेत .आणि त्या योजनांचा लाभ शेतकरी बांधवांना कसा मिळतो हे पाहण्यासाठी आज आपण या ब्लॉगमध्ये माहिती पाहणार आहोत .तसे तर मोदी सरकारने खूप योजना आणल्या आहेत परंतु आज आम्ही तुम्हाला अशा योजना बद्दल माहिती सांगणार आहोत. ज्या की केंद्र शासनाने खूप विचार करून आणि प्रत्येक नागरिकाला त्याचा फायदा होईल अशा योजना अमलात आणले आहेत फायदा घेण्यासाठी कुठलेही पैशांची केंद्र सरकार मागणी करत नाही आपण जर नियमांचे पालन योग्य पूर्तता केल्यास आपल्याला या योजनेमध्ये कुठलेही अडचण येणार नाही. चला तर मग पाहूया केंद्र सरकारच्या दहा योजना.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
सरकारने देशातील जनतेला अधिक सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवत आहे. या योजनेचा फायदा प्रत्येक व्यक्ती पर पर्यंत मिळवा यासाठी केंद्र सरकारने काही योजना आणल्या आहेत . प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना खूप लोकप्रिय आहे. ही योजना सरकारने चालू केल्यापासून जनतेमध्ये खूप आनंदाचे वातावरण आहे.
या योजनेमध्ये प्रत्येक शेतकरी येत असल्यामुळे त्यांच्या जीवनातील बऱ्याच अडचणी दूर होण्यास मदत झाली आहे. या योजनेमध्ये केंद्र सरकार देशांमधील शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये सहा हजार रुपये आर्थिक मदत करते. ही मदत केंद्र सरकार तीन विभागांमध्ये वाटून देते. यामध्ये दर तीन महिन्यांना दोन दोन हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करते.
या योजनेमध्ये जमिनीचे उत्पन्न आणि इतर काही बाबी लक्षात घेऊन लाभार्थ्यांना किंवा लाभार्थ्यांची पात्रता ठरवली जाते. आतापर्यंत या योजनेचे प्रत्येक शेतकऱ्यास सतरा हप्ते मिळाले आहेत. ते देखील क्षेत्राच्या खात्यामध्ये कुठल्याही अडचणी विना त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे आहे.
उज्वला योजना
देशातील महिलांचे जीवन बदलण्याच्या दृष्टिकोनातून मोदी सरकारने ही योजना 2016 मध्ये अमलात आणली. या योजनेचा महत्त्वपूर्ण उद्देश म्हणजे स्त्रियांना धुरापासूनचे आजार उद्भवतात त्यापासून त्यांचा संरक्षण करणे हाच होय. या योजनेमध्ये केंद्र सरकारने बारा सिलेंडर वर केंद्र सरकार अनुदान देते हे अनुदान गॅस कार्ड धारकाच्या बँक अकाउंट मध्ये जमा केले जाते.
एक मार्च दोन हजार 23 पर्यंत या योजनेमध्ये नऊ कोटी 59 लाख जनतेने लाभ घेतला आहे. या योजनेच्या विस्तारासाठी मोदी सरकारने एक योजना देखील जाहीर केले आहे. ज्याअंतर्गत 2023.24 ते2025.26 या तीन वर्षासाठी1650 कोटी रुपये खर्चून उज्वला एलपीजी कनेक्शन त्यामध्ये देण्यात येणार आहेत.
या योजनेचा फायदा प्रत्येक महिलांना मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत असून याचा फायदा प्रत्येक महिलाला मिळणार आहे त्यामुळे ही योजना देखील जनतेमध्ये खूप लोकप्रिय आहे.Bharat Srakiar 10 Yojana
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
केंद्र सरकारने2015.16 दरम्यान ही योजना अमलात आणली होती या योजनेमध्ये मृत्यू झाल्यास विमाधारकला दोन लाख रुपये आर्थिक मदत मिळते. या योजनेचा लाभ 18 ते 55 या वयोगटातील नागरी घेऊ शकतात. या योजनेमध्ये तुम्ही फक्त436 रुपये भरून या योजनेचा लाभ होऊ शकतात या योजनेचे पैसे देखील स्वयंचलितपणे विमाधारक खात्यामध्ये जमा होतात. या योजनेमध्ये विमाधारकाच्या खात्यामधून436 रक्कम वर्षाला स्वयंचलित पणे जमा होते.
आयुष्यमान भारत योजना
ही योजना देशांमधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांची काळजी घेण्याच्या उद्देशाने बनवले आहे ही योजना देशांमधील गरीब लोकांसाठी एक वरदान ठरत आहे मोदी सरकारने आयुष्यमान भारत योजना सुरू केल्यापासून गरीब जनतेमध्ये खूपच आनंदाचा वातावरण आहे या योजनेमध्ये आयुष्यमान भारत व्यक्तीला पाच लाखापर्यंत सरकारने नेमून दिलेल्या दवाखान्यामध्ये मोफत विलाज केला जातो. ही रक्कम सरकार स्वतः दवाखान्यामध्ये जमा करते. या योजनेचा आणखीन नागरिकांना लाभ मिळवण्यासाठी सरकारने आयुष्यमान भव ही मोहीम देखील सुरू केलेले आहे या मोहिमेअंतर्गत पात्र नागरिकांसाठी आयुष्यमान कार्ड बनवले जात आहे. आयुष्यमान कार्ड धारक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
अटल पेन्शन योजना
अटल पेन्शन योजना ही पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते असावे लागते तुमच्या ठेवी नुसार व सरकार काही रक्कम त्यामध्ये जमा करते व साठ वर्षानंतर आपल्याला पाच हजार रुपये प्रति महिना पेन्शन म्हणून आपल्याला मिळतात. ही पेन्शन आपल्या उत्पन्नावर देखील अवलंबून आहे. ही योजना भारतातील नागरिकता साठी असंघटित क्षेत्रातील कामगारावर लक्ष ठेवण्यासाठी अटल पेन्शन योजना आहे. भारत सरकारने चालवलेल्या या हॉटेल पेन्शन योजनेत18 ते40 वर्ष वया पर्यंत गुंतवणूक करावी लागते. तर प्रत्येक महिन्याला साठ वर्षानंतर आपल्याला पाच हजार रुपये प्रमाणे पेन्शन मिळते. ही पेन्शन आपल्या उत्पन्नावर देखील अवलंबून असते. या योजनेचा फायदा घेण्यासाठी भारतातील कोणताही नागरिक अटल पेन्शन योजनेमध्ये भाग घेऊ शकतो.
जनधन योजना
भारत सरकारने ही योजना सुरू केल्यानंतर त्यांचे स्पष्ट उद्दिष्ट लोकांसमोर ठेवले आहे की प्रत्येक नागरिक हा बँकेची निगडित असावा म्हणून बँकेमध्ये कुठलाही एक रुपयाही न भरता आपण आपल्या जवळच्या बँकेमध्ये हे खाते उघडू शकतो. जनधन योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेतील नागरिक शून्य शिल्लक खाते उघडू शकतात. सर्वसामान्यांना या खात्यामध्ये अपघात विमा,, पासबुक. याशिवाय सर्वसामान्यांना सुविधा देते. खातेधारकांना त्यांच्या खात्यामध्ये एक रुपया नसताना देखील10000 रुपये आपण काढू शकतो. ही योजना गरीब लोकांसाठी किंवा गरीब नागरिकांसाठी एक वरदान ठरत आहे.
pm विश्वकर्मा योजना
pm विश्वकर्मा योजना ही पारंपरिक कारागीर आणि हस्तकलाकारांना विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र दिले जात आहे ही योजना 2023 ते 2024 व 2017 ते 2018 पर्यंत लागू असणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये एक लाख रुपयांचे कर्ज नागरिकांना बिनव्याजी उपलब्ध करून दिले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये दोन लाख रुपयांचे कर्ज पाच टक्के सवलतीच्या व्याजदराने उपलब्ध होणार आहे. यासाठी कुठल्याही हमीभावाची गरज भासणार नाही. सरकारनेpm विश्वकर्मा योजना मध्ये 13000 कोटीची तरतूद करण्यात आले आहे ही पुढील पाच वर्ष लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे या योजना येणाऱ्या नागरिकांना उद्योग करण्यासाठी कर्ज मिळवून याचा फायदा होईल.
प्रधानमंत्री आवास योजना
प्रधानमंत्री आवास योजना ही देशातील प्रमुख्याने अत्यंत गरीब व बेघर लोकांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. घर बांधण्यासाठी सरकारकडून गरीब लोकांना या योजनेद्वारे मदत केली जाते. प्रामुख्याने या योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना स्वतःचे घर बांधण्यासाठी मदत केली जाते. टीएम आवास योजनेचे यामध्ये दोन प्रकार आहेत. पहिले पीएम आवास ग्रामीण आणि दुसरे पीएम आवास अर्बन जे शहरी भागासाठी आहे सरकारने ग्रामीण भागातील व शहरी भागातील लोकांना घरे बांधण्यासाठी120000 रुपये देते. बहुतेक राज्य सरकारमधील काही निधी या योजनेसाठी वापरला जातो त्यामुळे ही रक्कम वाढवून दोन लाख पन्नास हजार रुपये होते भारत सरकारच्या ताज्या आकडेनुसार संपूर्ण देशामध्ये आतापर्यंत चार कोटी होऊन अधिक लोकांना या योजनेअंतर्गत गरज देण्यात आले आहेत. ही योजना नागरिकांमध्ये खूपच लोकप्रिय असून गरीब लोकांसाठी या योजनेमधून निवडण्याची सोय होते. ज्या लोकांना राहण्याची व्यवस्था नसते त्या लोकांसाठी सरकार गायरान जमिनीमध्ये या लोकांसाठी पीएम आवास योजनेतून घर उपलब्ध करून देते.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
भारती सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश आहे. आणि भारतातील लोकांचे रक्षण करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे या उद्देशाने 2015 मध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू करण्यात आली. सुरुवातीला या वि प्रीमियम बारा रुपये होतात परंतु एक जून 2022 पासून वाढवतो वीस रुपये करण्यात आला आहे या योजनेमध्ये तुम्हाला दोन लाखापर्यंत अपघाती संरक्षण मिळते. जर तुमचे वय 18 ते 70 असेल तर तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता. या योजनेला वर्षांमध्ये वीस रुपये भरून आपण या योजनेमध्ये सहभाग नोंदवू शकतो. आणि या योजनेमध्ये सहभाग नोंदवल्यानंतर आपल्याला दोन लाखापर्यंतचे विमा संरक्षण मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक गरीब नागरिक उत्सुक असून त्याने या योजनेचा लाभ घेतलेला आहे म्हणून ही योजना खूपच लोकप्रिय झालेली आहे.Bharat Srakiar 10 Yojana