Keli Vishayi Mahiti: केळी फळाबद्दल संपूर्ण माहिती..!!

Keli Vishayi Mahiti: केळी फळाबद्दल संपूर्ण माहिती..!!

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये केळी या फळाबद्दल माहिती देणार आहोत. केळी हे फळ खाण्याचे फायदे कोणकोणते आहेत, केळी कधी खावे व केव्हा खाऊ नये त्याचबरोबर केळी बद्दल सविस्तर माहिती या लेखांमध्ये देण्यात येणार आहे. जर केळी बद्दल आपल्याला देखील सविस्तर माहिती जाणून घ्यायचे असेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

केळी हे एक असे फळ आहे जे की सर्वजण खात असतात. सर्वांनाच केळी हे फळ आवडते त्याचबरोबर हे फळ सर्व फळांपैकी एक लोकप्रिय फळ आहे. केळी हे फळ जगभरात खाल्ले जाणारे फळ आहे त्याचबरोबर या फळाचा वापर हा अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी देखील केला जातो. केळी हे फळ रोगप्रतिकारशक्ती वाढवून आजारांना दूर करण्याचे काम देखील करते. या फळांमध्ये जास्त प्रमाणात फायबर पोटॅशियम आणि मॅग्नेशियम त्याचबरोबर व्हिटॅमिन सी आढळून येते. केळी हे एक असे फळ आहे जे की सर्वसामान्य लोक देखील उपवासाच्या दिवशी त्याचबरोबर असे कधीही खातात.

केळी हे एक फळ आहे. सुपर फूड म्हणून देखील केळीकडे बघितले जाते. बरेच लोक हे दररोज केळी खात असतात परंतु केळी खाण्याचे काय फायदे आहेत हे त्यांना माहीत नसते. त्याचबरोबर कोणती केळी खावी हे देखील बऱ्याच जणांना माहीत नसते. केळी वरती जर काळे डाग असतील तर आपण त्याला ती केळी खराब आहे असे म्हणतो. परंतु काळे डाग असणारी केळी ही आपल्या आरोग्याला अनेक फायदे देते.

जर एखाद्या व्यक्तीला वजन वाढवायचे असेल तर त्याच्यासाठी देखील केळी घ्या उपयुक्त ठरतात. सर्वजण केळी खात असतात परंतु केळी केव्हा खायला पाहिजे त्याचबरोबर केळीमध्ये कोणकोणते खनिजे असतात व आपल्या शरीराला लागणारे कोणते आवश्यक पोषक तत्व हे केळीमध्ये आहेत हे माहीत नसते. चला तर मग जाणून घेऊ केळीमध्ये आपल्या शरीरासाठी लागणारे कोणते आवश्यक तत्त्व किंवा पोषक तत्व आहेत. केळीमध्ये आयर्न आणि व्हिटॅमिन हे तर असतेच परंतु त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम देखील आढळून येते.

त्याचबरोबर पिकलेली जी केली असते त्या केळीमध्ये अँटीऑक्सिडेंट तत्वाचं प्रमाणही वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि एफओऐस तत्व देखील केळीमध्ये आढळून येते. केरामध्ये असणारे हे एफओऐस तत्व हे पोटांचे जे आजार आहेत ते दूर करण्यासाठी फायद्याचे ठरतात. एखाद्या व्यक्तीला जर जळजळ होत असेल तर त्यांनी पिकलेली केळी खावे. कारण पिकलेली जी केळी असते ती केळी पोटामध्ये होणारी जळजळ त्याचबरोबर जर अपचनची समस्या असेल, तर ती अपचनाची समस्या देखील दूर करण्यासाठी मदत करते.Keli Vishayi Mahiti

आपल्या आरोग्यासाठी केळी खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत ते जाणून घेऊ

केळी खाणे हे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे आहे. केळी खाल्ल्याने आपल्या आरोग्याला कोणकोणते फायदे होतात ते पाहू.

केळी हे फळ रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करते. इतर जी फळे असतात त्या फळांच्या बरोबर जर केळी या फळाची तुलना केली तर केळीमध्ये ज्या कॅन्सरच्या पेशी आहेत त्या पेशंट सोबत लढण्याची क्षमता ही जास्त असते. ज्या केळींवर जेवढे जास्त काळे डाग असतात त्या केळीमध्ये रोगांशी लढण्याची क्षमता ही जास्त विकसित असते. म्हणजेच आपल्या आरोग्यासाठी काळे डाग असणारे केळी खाणे देखील फायद्याचे आहे. कॅन्सरच्या पेशी सोबत लढण्याची क्षमता ही केळी फळांमध्ये जास्त असलेली दिसून येते.

केळी या फळाचा फायदा हा आपल्या आरोग्यासाठी होतो त्याचबरोबर कॅन्सरशी लढण्यासाठी देखील केळी या फळाचा फायदा होतो. केळीवर काळे डाग असते ती केली आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी असते असे जपानच्या संशोधकांनुसार सांगण्यात आलेले आहे. इतर जे फळ आहेत त्या फळांच्या तुलनेत केळी या फळांमध्ये सर्वात जास्ती चे अँटिक आन्सर तत्व असतात. अँटी कॅन्सर तत्व हे कॅन्सरशी लढण्यासाठी मदत करतात.

केळी हे फळ खाल्ल्याने आपली जी पचनक्रिया आहे ती देखील चांगली राहण्यास मदत होते. पिकलेली जी केळी असते ती केळी पचन होण्यासाठी सोपी त्याचबरोबर चांगली असते. केळीही पचन सोपी का असते कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याचे आपल्याला आढळून येते. ज्या फळांमध्ये किंवा पदार्थांमध्ये फायबर हे जास्त प्रमाणात असते ते आपल्या पचनासाठी फायदेशीर असते त्याचबरोबर त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते. तसेच केळीमुळे देखील पचनक्रिया सुधारते.

केळीचा फायदा हा ऊर्जेचा स्त्रोत म्हणून देखील होतो. कारण के मध्ये साखर नसून त्याच्यामध्ये नैसर्गिक साखर आढळून येते. जर आपण एखादे काम केले आणि त्या कामाने आपण थकून गेलो तर आपल्या शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी आपण जर एक दोन केळीचे सेवन केले तर आपल्या शरीराला त्यामुळे ऊर्जा मिळते. आजकाल उच्च रक्तदाबाची समस्या ही खूप लोकांना असल्याची बघायला मिळते. ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांच्यासाठी देखील केळी हे फळ फायद्याचे आहे. ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी नियमित केळी खाव्यात. नियमित केळी खाल्ल्याने त्यांच्या शरीरावर अनेक चांगले फायदे होतील.

केळी या फळामुळे आपल्या शरीरावर आलेला ताण-तणाव कमी होतो. केळी या फळांमध्ये एक अमिनो ऍसिड असतं त्याचं नाव ट्रायप्टोफान हे आहे.ट्रायप्टोफान हे अमिनो ऍसिड आपल्या शरीरावरील तणाव कमी करण्यासाठी मदत करते. केळी देखील आपल्या शरीरावर असणाऱ्या तान तणाव कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत असे म्हणले जाते. कारण केळीमध्ये हे ट्रायप्टोफान अमिनो ऍसिड असते. शरीरातील सेरोटोनीनच प्रमाण वाढवण्याचे काम केळी हे फळ करते. त्यामुळे त्या व्यक्तीला आलेला ताण-तणाव कमी होऊन मूड चांगला राहण्यासाठी मदत होते.

केळीचा आणखी एक फायदा आहे तो म्हणजे तोंडाला जी फोड येतात ती दूर करण्यासाठी देखील केळी फायदेशीर ठरते. आज काल बऱ्याचशा व्यक्तींना तोंडाला फोड येण्याची समस्या देखील उद्भवत आहे. ज्या व्यक्तींच्या तोंडाला सतत फोड येत आहेत त्यांनी कच्ची एक खाल्ली तर तोंडाला येणारी फोड कमी होण्यास मदत होईल. ज्या व्यक्तीला सतत तोंड येते त्यावरती रामबाण उपाय म्हणून केळी हे फळ आहे.

हे आहेत केळी हे फळ खाण्याचे फायदे तसेच केळी या फळामुळे आपल्या शरीराला आणखी भरपूर फायदे मिळतात. ते सुद्धा या लेखांमध्ये सांगितलेले आहेत परंतु काही वरी काही खाली असे करून सर्व फायदे सांगितले आहेत.

केळी हे फळ आपल्या झोपेची गुणवत्ता देखील वाढू शकते. झोपी नियमित व चांगली लागण्यासाठी ज्या हार्मोन्सची गरज असते ते हार्मोन्स देखील केळी या फळामुळे तयार होण्यास मदत होते. केळी हे फळ स्लिप फ्रेंडली स्नॅक आहे. केळी या फळामुळे आपल्या शरीराला खूप फायदे होतात. केळीमध्ये विटामिन बी 6 सारखे आवश्यक असणारे पोषक तत्व देखील आढळून येतात.

केळी या फळाचा अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजेच केळी हे आपल्या शरीरामध्ये होणारी जी रक्तभिसरण क्रिया आहे ती सुधारण्यास देखील मदत करते. रक्तभिसरण क्रिया केळी सुधारते कारण केळीमध्ये मॅग्नेशियम हे असते. आणि मॅग्नेशियम जे आहे ते रक्तामध्ये असणाऱ्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते. रक्तवाहिन्यांमधील रक्तभिसरण सुरळीत होण्यासाठी कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होणे गरजेचे असते. केळी खाल्ल्यानंतर रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते त्यामुळे रक्तवाहिन्यांमधील रक्तभिसरणही सुरळीत होण्यास मदत होते. तसेच बुद्धकोष्ठतेमध्ये देखील केळी हे फळ फायदेशीर ठरते.

केळी खाण्याचे फायदे आपण जाणून घेतले आहेत परंतु केळी आपण कोणत्या वेळी खायला पाहिजे किंवा कधी नाही बघायला पाहिजे याबद्दल जाणून घेऊया.

केळी खाण्याची वेळ अशी काही ठरवलेली नसते. केळी आपण कधीही खाऊ शकतो परंतु ज्या व्यक्तींना केळ खाल्ल्यानंतर सर्दी होण्याचे चान्सेस असतात त्या व्यक्तीने रात्री केळी खाऊ नये. कारण रात्री केळी खाल्ल्याने त्या व्यक्तींना सर्दी आणि खोकला होण्याचे चान्सेस असतात.Keli Vishayi Mahiti

Sharing Is Caring:

Leave a Comment