Sravan Somavar News: श्रावण महिन्यात किती सोमवार आहेत? तसेच सोमवार विषयी संपूर्ण माहिती…
नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये अतिशय महत्त्वाची त्याचबरोबर आपल्याला फायदेशीर ठरेल अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजेच यावर्षी श्रावण महिन्यामध्ये किती सोमवार आहेत तसेच कोणत्या सोमवारी महादेवाला कोणती मूठ वाहायची आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
यावर्षीचा हा श्रावण महिना या श्रावण महिन्याची सुरुवात हीच श्रावणी सोमवार पासून झालेली आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे श्रावण महिन्यामध्ये सर्व महिला त्याचबरोबर पुरुष देखील महादेव या देवाची पूजा करत असतात त्याचबरोबर महादेवाला बेल अर्पण करतात तसेच दह्या दुधाने अंघोळ देखील घालतात. महादेवाची पूजा आपण असे कधीही करतो परंतु श्रावण महिन्यामध्ये महादेवाला विशेष महत्त्व देण्यात आलेला आहे. श्रावण महिन्यामध्ये दर श्रावणी सोमवारी महादेवाला एक शिवमूठ वाहली जाते. प्रत्येक श्रावणी सोमवारी ती शिव मोठी वेगवेगळी असते. तर आपण तेच जाणून घेणार आहोत की कोणत्या सोमवारी कोणती शिवमुठ आहे.
श्रावण महिना म्हणलं की सर्वांना आतुरता असते महादेवाच्या पूजेची त्याचबरोबर श्रावणी सोमवारची. तर यावर्षी या श्रावण महिन्याची सुरुवातच श्रावणी सोमवार आणि झाल्यामुळे पहिला श्रावणी सोमवार हा 5 ऑगस्ट रोजी आलेला आहे. महादेवाचा आवडता वार सोमवार तसेच श्रावण महिन्यात विशेष महत्त्व देण्यात येणारा हा वार म्हणता येईल. चला तर मग आपण जाणून घेऊया की कोणत्या सोमवारी कोणती शिवमुठ वाहायची आहे.Sravan Somavar News
श्रावण महिन्यामध्ये यावर्षी पाच श्रावणी समोर येत आहेत. यावर्षीच्या श्रावण महिन्याची सुरुवात ही श्रावणी सोमवारपासून झाल्यामुळे या महिन्यांमध्ये पाच सोमवार येत आहेत. पहिला श्रावणी सोमवार हा 5 ऑगस्ट रोजी आहे आणि या दिवशी महादेवाला वाहायची शिवमूठ तांदूळ आहे. आपण पाहतो प्रत्येक सोमवारी महिला जी मूठ आहे तीच मुठ नेऊन महादेवाची पूजा करत असतात. दुसरा श्रावणी सोमवार हा 12 ऑगस्ट रोजी आहे या दिवशी शिवमुठ तीळ ही आहे. या दिवशी महादेवाची पूजा करत असताना आपल्या पूजेच्या सामानामध्ये तीळ असणे गरजेचे असते. महादेवाला आपण तीळ वाहावे.
19 ऑगस्टला तिसरा श्रावणी सोमवार येत आहे या दिवशी शिवमुठ आहे मूग. तिसऱ्या श्रावणी सोमवारी मूग नेऊन आपण महादेवाची पूजा मनोभावे करावी. 26 ऑगस्ट 2018 या दिवशी या श्रावण महिन्यातील चौथा श्रावणी सोमवार येतो. चौथ्या श्रावण सोमवारची शिवमुठ जव आहे. त्याचबरोबर शेवटचा आणि पाचवा श्रावणी सोमवार हा 2 सप्टेंबरला येतो या दिवशी वाहायची शिवमुठ ही सातू आहे. या होत्या या श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवारला वाहायाच्या शिवमूठ. आपण वरील या श्रावण महिन्यातील पाचही सोमवार कधी येतात त्याचबरोबर कोणती मूठ कधी आहे याबद्दल माहिती जाणून घेतली आहे.
श्रावण महिन्याचे महत्व जाणून घेऊया
श्रावण महिना हा सर्वांसाठीच महत्त्वाचा मानला जातो. परंतु श्रावण महिना एवढा महत्त्वाचा त्याचबरोबर अतिशय आनंदाचा का मानला जातो हे आपण पाहूया. श्रावण महिन्याला भगवान शंकराच्या उपासनेचा महिना असे मानले जाते. आपण पाहतो श्रावण महिना आला की बऱ्याच स्त्रिया तसेच काही पुरुष हा श्रावण महिना पाळत असतात. म्हणजे पूर्ण महिनाभर काही स्त्रिया तसेच काही पुरुष हे उपवास करत असतात.
या महिन्यांमध्ये श्रावणी सोमवारी शंकराची मनोभावे पूजा करून त्या दिवशी बरेच व्यक्ती दिवसभर उपवास करतात आणि रात्री थोडे जेवण करून हा उपवास सोडत असतात. हा महिना भगवान शंकराच्या उपासनेचा मांडला गेलेला आहे त्यामुळे बरेचसे लोक हा श्रावण महिना भक्ती भावाने पाळताना आपल्याला बघायला मिळते. या महिन्यांमध्ये भरपूर व्यक्तींना उपवास असतात. श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची मनोभावे आराधना करून त्या दिवशी दिवसभर उपवास केल्याने आपल्या मनाला शांती त्याचबरोबर आनंदमय वातावरण निर्माण झालेले बघायला मिळते.
श्रावण महिन्यामध्ये कोणता सण येतो हे आपण जाणून घेऊया
श्रावण महिन्यामध्ये छोटे-मोठे काही सण येत असतात. ते कोण कोणते सण आहेत त्याचबरोबर त्या सणांना काय करावे लागते याबद्दलची आपण माहिती पाहूया. या श्रावण महिन्यामध्ये पहिला सण येतो तो म्हणजे नागपंचमी. नागपंचमी दिवशी लहानापासून मोठ्यांपर्यंत झोका घेण्याची एक पद्धत आहे. नागपंचमीच्या दिवशी कमीत कमी पाच झोके तरी खेळावे असे पूर्वीपासून चालत आलेले आहे.
नागपंचमी हा सण श्रावण महिन्यात येणारा आहे. नागपंचमी हा सण असा सण आहे जो की श्रावण महिन्यात येतो आणि त्याचा संबंध हा पर्यावरणाशी आहे. म्हणजेच नागपंचमीला आपण पाहतो की सर्वजण घरोघरी नागाची पूजा करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर काही स्त्रिया आपल्या परिसरात आजूबाजूला असणाऱ्या नागाच्या वारुळाची पूजा देखील करतात. नागपंचमी या सणाच्या एक दिवस अगोदर भाऊचा उपवास हा धरला जातो. हा भाऊ चा उपवास हा प्रत्येक स्त्री धरत असते.
या दिवशी नागदेवतेची म्हणजेच नागाच्या वारुळाची पूजा देखील केली जाते. ही पूजा करण्या मागचा हेतू म्हणजेच नागदेवता जी आहे त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देखील ही पूजा करण्यात येते. शुद्ध पंचमीच्या दिवशी कालिया नागाचा पराभव करून जी यमुना नदी आहे त्या यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते सुरक्षित आले होते तो दिवस म्हणजेच नागपंचमीचा दिवस आहे. आणि या दिवसापासूनच तर खरी नागपूजा करण्यासाठी सुरुवात झालेली आहे. म्हणूनच नागपंचमीला नाग पूजा करण्यात येते किंवा या दिवशी नागपूजा करण्यात येते असे सांगण्यात आलेले आहे.
श्रावण महिन्यातील नागपंचमी नंतर येणारा दुसरा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीचे प्रेम व्यक्त करण्याचा एक सण आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते. आणि भाऊ आपल्या बहिणीला काही ओवाळणी देतो त्याचबरोबर मी तुझी रक्षा करीन असे वचन देखील देत असतो. रक्षाबंधन हा सण खूप आनंदाचा त्याचबरोबर या दिवशी भाऊ बहिणीचे प्रेम हे वाढताना दिसून येते. रक्षाबंधन हा एक श्रावण महिन्यात येणारा लोकप्रिय सण आहे.
आपल्या संस्कृतीतला एक सुंदर सोहळा म्हणून रक्षाबंधन या सणाला ओळखले जाते कारण या दिवशी बहिण भाऊ आपले प्रेम व्यक्त करत असतात. राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा त्या पौर्णिमेच्या दोन दिवस लागोपाठ असेल तर रक्षाबंधन हा दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरा केला जातो हे हिंदू पंचांगाप्रमाणे सांगितले जाते. रक्षाबंधनच्या दिवशी बहिण आपल्या भावाला भेटते. बहिण ही भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून अशी मनोकामना करते की आपल्या भावाला दीर्घायुष्य मिळवून त्याचबरोबर त्याच्या आयुष्यामध्ये भरभराटी मिळू दे, त्याला पाहिजे ते सुख मिळू दे अशी मनोकामना करत असते.
श्रावण महिन्यामध्ये अजून एक सण येतो तो म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी. यावर्षीच्या या श्रावण महिन्यामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी देखील श्रावणी सोमवारी येत आहे. हा श्रावण महिन्यामध्ये येणार एक अत्यंत लोकप्रिय त्याचबरोबर मोठा सण आहे. श्रावण महिन्यातील वद्य अष्टमी च्या दिवशी मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरा या गावामध्ये कंसाच्या बंदी शाळेत श्रीकृष्णाचा जन्म हा देवकीच्या पोटी झाला.
म्हणून या दिवशी आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करतो. श्रीकृष्ण जन्माष्टमी सुरुवातीला घरोघरी साजरी करायचे परंतु आता या श्रीकृष्ण जन्माष्टमीला एक मोठे सामाजिक आणि सार्वजनिक स्वरूप मिळालेले आपल्याला बघायला भारतामध्ये मोठ्या उत्साहात ही श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करताना आपण पाहतो. या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी एक सण येतो तो म्हणजेच गोपाळकाला. या गोपाळकालाच्या दिवशी दहीहंडी फोडली जाते हा सण देखील सुरुवातीला घरगुती पद्धतीने साजरा करायचे.परंतु दिवसेंदिवस ही श्रीकृष्ण जन्माष्टमी भारतामध्ये मोठ्या जल्लोषाने साजरी होत आहे.
पोळा हा सण श्रावणी महिन्याच्या शेवटी म्हणजेच अमावस्येच्या दिवशी किंवा त्यानंतर येतो. भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपण पाहतो आपल्या या भारत देशामध्ये असे अनेक छोटे-मोठे सण साजरे केले जातात. असे सण की ज्यातून पक्षांची प्राण्यांची कृतज्ञता व्यक्त केली जाते. पोळा या सणाला बैलाची पूजा करण्यात येते. आपण तर पाहतो बैल हा शेतकऱ्याचा एक जिवलग मित्र बनला आहे. कारण आपला देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो.आपल्या या देशांमध्ये जास्त प्रमाणात शेती केली जाते. आणि या शेतात नांगरण्यासाठी पाळी घालण्यासाठी बैलाची खूप खूप गरज भासत आहे.
त्यामुळे शेतकरी राजा हा बैलाला आपल्या घरी एक घरचा सदस्य म्हणून जागा देतो. आणि तो या पोळा या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो. जशी आपण दिवाळीचे आतुरतेने वाट पाहतो त्याच पद्धतीने आपण पोळा या सणाची देखील वाट पाहतो. या दिवशी बैलाला आंघोळ घातली जाते त्याचबरोबर त्याला छान सजवले जाते. त्याला खाण्यासाठी गोडधोड जेवण बनवले जाते. बैलाला छान अंघोळ घालून सजवल्यानंतर त्याची गावांमधून मिरवणूक काढली जाते. पोळा हा देखील खूप खूप आनंदाचा त्याचबरोबर उत्साहाचा सण आहे. सर्व शेतकऱ्यांच्या घरात पोळा हा अगदी दिवाळीप्रमाणेच साजरा केला जातो. आपण पाहतो शहरामध्ये अनेक घरी मातीचे बनवलेले बैल आणून त्या बैलाची पूजा करून हा सण साजरा करताना आपण पाहतो. पोळा या सणाला बैलाची पूजा करण्याची प्रथा आहे.Sravan Somavar News