Mazi Ladaki Bahin Yojna: राज्यातील सर्व महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, पहा या योजनेची संपूर्ण माहिती मराठी मधून

 

Mazi Ladaki Bahin Yojna: राज्यातील सर्व महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, पहा या योजनेची संपूर्ण माहिती मराठी मधून

नमस्कार मित्रांनो आपण आजच्या या लेखांमध्ये अतिशय महत्त्वाची त्याचबरोबर महिलांच्या फायद्याची एक नवीन बातमी पाहणार आहोत. सरकारने महिलांसाठी राबविण्यात आलेल्या योजनेचे नाव ‘लाडकी बहीण योजना’ हे आहे.सरकारने महिलांसाठी एक अशी योजना राबवली आहे की त्यामध्ये त्या महिलेला दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. तर दर महिन्याला 1500 रुपये मिळवायचे म्हणल्यास आपल्याला नेमकं काय काय करावे लागेल, त्याचबरोबर त्या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत,

कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत आणि या योजनेचा अर्ज कोठे करायचा याबद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. आपल्याला जर लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर आपल्याला कोणकोणती कागदपत्रे लागतात हे माहीत असणे आवश्यक आहे. या योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. या लेखांमध्ये दिलेली माहिती ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची त्याचबरोबर फायद्याची ठरेल.

सरकारने माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर अर्जाची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट आहे. 31 ऑगस्ट पर्यंत आपण या योजनेसाठी अर्ज करू शकतो. परंतु यामध्ये काही अटी आहेत त्या अटी कोणत्या आहेत हे आपण पाहू.

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्या महिलेचे वय हे कमीत कमी 21 असणे गरजेचे आहे. या योजनेचा लाभ 21 ते 60 वयोगटातील महिलांनाच मिळणार आहे.

या योजनेचा लाभ ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना मिळणार नाही.

ज्या कुटुंबामध्ये इन्कम टॅक्स भरणारा म्हणजेच आयकर दाता आहे त्या कुटुंबातील महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

या योजनेची घोषणा कोणी केली हे आपण पाहू
अजित पवार हे अर्थमंत्री आहेत. यांनी लाडकी बहीण योजनांची घोषणा केलेली आहे, त्यांनी मुलींना मोफत शिक्षण मिळावं याबद्दल सुद्धा घोषणा केलेली आहे आणि जे लोक बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काही योजनांची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे.

लाडकी बहीण योजना ही घोषणा अर्थसंकल्प मांडताना अजित पवार यांनी केलेली आहे. या योजनेची अंमलबजावणी ही एक जुलैपासून झालेली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. ही योजना महिलांसाठी फायदेशीर ठरणार आहे.Mazi Ladaki Bahin Yojna

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर लाभार्थी कोण आहे हे जाणून घेऊ

लाडकी बहीण योजना ही राबवण्यात आलेली आहे.परंतु या योजनेचा लाभ हा सर्व महिलांना मिळणार नाही यासाठी काही अटी आहेत. या योजनेचा लाभ ज्या महिलांचे वय 21 ते 60 वयोगटांमध्ये येते त्याच महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या योजनेसाठी घरातील वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. जर महिलांचे वय 21 ते 60 मध्ये बसत आहे परंतु त्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही.

कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या योजनेच्या अटी ज्या आहेत त्या संपूर्ण जाणून घेतल्या पाहिजेत. आणि नंतरच त्या योजनेला अर्ज करावा. एक अट पूर्ण आहे याचा अर्थ सर्व अटीमध्ये मान्यता आहे असं नाही. म्हणजेच आपण एका अटीमध्ये बसत असलो तर लगेचच आपल्याला या योजनेचा लाभ मिळेल असे नाही.

लाडकी बहीण योजनेचा लाभ कोण कोणत्या महिलांना मिळणार आहे ते जाणून घेऊ,

लाडकी बहीण योजना ही घोषणा अजित पवार यांनी केलेली आहे. ही घोषणा केल्यानंतर सर्व महिला आनंदीत झाल्या. सर्वांना वाटले की आता आपल्याला महिन्याला 1500 रुपये मिळणार.परंतु सर्व महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही चला तर मग जाणून घेऊ या योजनेचा लाभ नेमका कोणत्या महिलांना मिळणार आहे. या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास ती महिला महाराष्ट्र राज्यातच राहणारी पाहिजे. म्हणजेच ज्या महिलेला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ती महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे गरजेचे आहे. तरच त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.

महाराष्ट्र राज्यातील विवाहित त्याचबरोबर विधवा असणाऱ्या महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी घटस्फोटीत महिला त्याचबरोबर निराधार महिला देखील पात्र ठरत आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ हा परित्यक्त्या महिलांना सुद्धा मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेऊन प्रत्येक लाभार्थी महिला महिन्याला 1500 रुपये मिळू शकते.

लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने राबवलेली एक योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले वय 60 वर्षापेक्षा कमी आणि 21 वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे. जर आपले वय 21 वर्षापेक्षा जास्त आणि 60 वर्षापेक्षा कमी असेल तर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतात. जर आपले वय सांगितल्याप्रमाणे असेल तर आपण या योजनेसाठी लाभार्थी ठराल.

लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या महिलांना लाभ घ्यायचा आहे त्या लाभ घेणाऱ्या महिलांचे म्हणजेच अर्ज करणारे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांचे स्वतःचे बँक खाते असणे सुद्धा महत्त्वाचे आहे. ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांचे बँक खाते असायला पाहिजे .

लाडकी बहीण योजना ही योजना महिलांसाठी खूपच फायदेशीर आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या कुटुंबातील जे वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखांपेक्षा जास्त नसायला पाहिजे. जर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर त्या महिलाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

लाडकी बहीण योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागत आहेत

ज्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या व्यक्तीचे हे खाली दिलेले कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
जन्म प्रमाणपत्र अधिवास किंवा , उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आधर कार्ड,अर्जदाराचे हमीपत्र, अर्जदाराचे दोन फोटो आणि त्याचबरोबर बँक पासबुक असणे अत्यावश्यक आहे. ही कागदपत्रे असतील तरच आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

आपल्याला बघायला मिळत आहे की उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी भरपूर रांगा बघायला मिळतात. त्याचबरोबर लवकर उत्पन्नाचे प्रमाणपत्र सध्या भेटत नाही. कोणतेही कागदपत्रा नसेल तर ते काढण्यासाठी सध्या थोडा टाईम लागत आहे कारण साईट लोड होत आहेत. सगळ्यांनाच सध्या कागदपत्रांची खूप गरज आहे. हे कागदपत्र नसतील तर आपण लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत. त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर ही सर्व कागदपत्रे जमा करून 31 ऑगस्ट च्या अगोदर या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करावा. ज्या महिला 31 ऑगस्ट च्या अगोदर या योजनेसाठी अर्ज करतील त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. आपल्याला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण सुद्धा काळजीने लवकरात लवकर हा फॉर्म भरायला पाहिजे.

लाडकी बहीण योजनेचा अर्ज आपण ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोठेही भरू शकतो. परंतु हा अर्ज भरण्यासाठी लागणारे कागदपत्र आपल्याकडे असणे तेवढेच महत्त्वाचे आहे. सगळे कागदपत्रे आपल्याजवळ असतील तर हा अर्ज लवकरात लवकर भरला येतो. आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न पडत असेल आपण अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन कुठेही करू शकतो परंतु केलेला अर्ज किंवा भरलेला अर्ज हा नंतर कोठे जमा करायचा हे आपल्याला माहित नाही तर आता आपण त्याबद्दल माहिती पाहू.
आपण जो लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरणार आहात तो अर्ज आपण आपल्या जवळच्या अंगणवाडीमध्ये जमा करायला पाहिजे.

त्यामध्ये आपण जो अर्जदार आहेत त्याने भरलेला तो संपूर्ण अर्ज जवळच असणाऱ्या अंगणवाडी केंद्रावर ती जाऊन त्यांच्याकडे जमा करायला पाहिजे. तसेच हा अर्ज आपण जवळ असणाऱ्या सेतू सुविधा केंद्रावर देखील जमा करू शकतो. तरच आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो. सध्या हा भरलेला अर्ज जमा करण्यासाठी जवळच असणाऱ्या सेतू सुविधा वर सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी बघायला मिळत आहे त्याचबरोबर ज्या महिलांचे एखादे कागदपत्र नाही त्या त्यांचे कागदपत्र काढण्यासाठी जात आहेत त्यामुळे तिथे अजूनच गर्दी बघायला मिळते.

लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे कागदपत्रे त्याचबरोबर त्यासाठी कोणत्या महिला पात्र आहेत तसेच कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही याबद्दल संपूर्ण माहिती या लेखांमध्ये दिलेली आहे. Mazi Ladaki Bahin Yojna

Sharing Is Caring:

Leave a Comment