Busniess Idea: कमी खर्चात जास्त नफा देणारे पीक

Busniess Idea: कमी खर्चात जास्त नफा देणारे पीक

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये सर्वात कमी वेळा त येणारी व जास्तीत जास्त नफा देणारी कोथिंबीर याबद्दल माहिती पाहणार आहोत. या लेखांमध्ये आपण कोथिंबीर लागवडीपासून ते कोथंबीर काढणीपर्यंतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. ही पूर्ण माहिती आपल्यासाठी खूप फायद्याची ठरेल. जर आपल्याला कोथिंबीर लागवड करायची असेल आणि त्यामध्ये चांगला नफा मिळवायचा असेल तर नक्कीच आपण हा लेख वाचावा. यामध्ये कोथिंबीर या पिकाबद्दल सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. कोथिंबीर ही पीक उत्तम पीक म्हणून घेतले जाते. कोथिंबीर या पिकाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचावा.

कोथंबीर या पिकाला वर्षभर बाजारामध्ये चांगली मागणी असते कारण कोथिंबीर ही दररोज वापरली जाते. त्याचबरोबर कोथिंबीर चा वापर हा घरी, हॉटेल आणि रेस्टॉरंट मध्ये देखील केला जातो.

कोथिंबीर या पिकाला बाजारामध्ये खूप चांगल्या प्रकारची मागणी असते. असं नाही की कोथिंबीर ही याच वेळ लागते. कोथिंबीर ही कधीही वापरात येणारी त्याचबरोबर कधीही मागणी असणारी पीक आहे. कोथिंबिरीचा वापर दैनंदिन जीवनामध्ये रोजच केलेला आपण पाहतो त्यामुळे या कोथिंबीरीला जास्त प्रमाणात मागणी आहे. कोथिंबीर ही घरातच नाही तर हॉटेल रेस्टॉरंट मध्ये देखील वापरली जाते. त्यामुळे अजूनच त्याची मागणी वाढताना आपल्याला बघायला मिळते. कोथंबीर हे पीक येण्यासाठी जास्त दिवस लागत नाहीत.हे पीक थोड्याच दिवसात येते त्याचबरोबर या पिकासाठी जास्त मेहनत घेण्याची गरज नाही. म्हणूनच कोथिंबीर आहे पीक उत्तम पीक आहे. कोथिंबीर हे पीक घेण्यासाठी जास्त पैशाची गरज नसते त्याचबरोबर त्यासाठी जास्त जागा असावी असे देखील नाही. कोथिंबीर या पिकाची लागवड करून आपण जास्तीत जास्त नफा मिळू शकतो.

कोथिंबीर या पिकाची लागवड कधी केली जाते याबद्दल माहिती जाणून घेऊ, पावसाळी व हिवाळी हंगामात कोथिंबीरीची लागवड ही प्रामुख्याने केली जाते. त्याचबरोबर कोथिंबीर ही उन्हाळ्यामध्ये देखील लावली जाते, परंतु उष्णतेमुळे कोथंबीर चे उत्पादन हे कमी निघत असते. तरी सुद्धा कोथिंबीरला मोठ्या प्रमाणात मागणी असते. उन्हाळ्यामध्ये सुद्धा कोथंबीरीला मागणी असते परंतु त्या वेळेला कोथिंबिरीचा पुरवठा हा खूपच कमी असतो त्यामुळे देखील कोथिंबिरीला चांगला भाव बाजारात मिळत असलेला बघायला मिळतो. त्यामुळे या पिकांमध्ये उत्तम आणि चांगला आर्थिक नफा मिळतो.

जाणून घेऊया 100 gm खाण्यायोग्य कोथिंबीर मध्ये कोणकोणते घटक असतात व किती प्रमाणात असतात. 86% पाण्याचे प्रमाण हे 100 ग्रॅम कोथिंबीरी मध्ये असते. त्याचबरोबर 100 ग्राम कोथिंबीर मध्ये 3.3% प्रथिनेचे प्रमाण असते, 0.14% जीवनसत्व क चे प्रमाण असते, 0.2% कॅल्शियमचे प्रमाण असते तसेच त्यामध्ये ज्या कॅलरी असतात त्या 445 आहेत. हे झाले 100 ग्रॅम खाण्यायोग्य कोथिंबीर मध्ये असणारे घटक.

कोथंबीर या पिकाची लागवड करण्यासाठी जमीन कशी असली पाहिजे हे जाणून घेऊ

कोथिंबीर या पिकाची लागवड करायची म्हणलं तर त्यासाठी योग्य अशी जमीन असणे गरजेचे आहे. कोथिंबीर या पिकाची लागवड करण्यासाठी जमीन ही मध्यम खोलीची त्याचबरोबर मध्यम कसदार असणे योग्य आहे. कोथिंबीर या पिकाची लागवड हलक्या जमिनीतही करू शकतो परंतु त्या जमिनीतील माती ही पोषण मूल्य भारीत असली पाहिजे तरच त्या जमिनीत कोथिंबीर या पिकाची शेती चांगल्या पद्धतीने करता येईल. जर आपल्याकडे हलकी जमीन असेल तर आपण मातीचे परीक्षण करून देखील योग्य त्या खतांचा पुरवठा केल्यानंतर सुद्धा कोथिंबीर या पिकाची लागवड करून चांगल्या प्रमाणात त्यातून उत्पन्न घेऊ शकतो. हलक्या जमिनीत जर कोथिंबीर लागवड करायची असेल तर त्यामध्ये आपल्याला सेंद्रिय खताचा वापर करावा लागतो. जर हलक्या जमिनीमध्ये सेंद्रिय खताचा वापर केला तर आपण त्या जमिनीची भौतिक गुणवत्ता असते ती सुधारता येते. या पद्धतीने जर आपण कोथिंबीर या पिकाची लागवड केली तर त्या उत्पन्नामध्ये वाढ होते त्याचबरोबर कोथिंबीरची सुद्धा गुणवत्ता चांगली मिळेल.Busniess Idea

कोथिंबीर लागवडीसाठी कोणते हवामान योग्य आहे ते पाहू

कोथिंबीर या पिकाची लागवड करण्यासाठी कोणतेही हवामान कसे योग्यच मानले जाते. कारण कोथिंबीर या पिकाची लागवड कोणत्याही ऋतूमध्ये केलेली बघायला मिळते. कोथिंबीर या पिकाची लागवड जर उन्हाळ्यात केली तरी सुद्धा कोथंबीर चांगल्या प्रमाणात येते परंतु जर उन्हाळ्यामध्ये जास्त ऊन असेल तरच कोथिंबिरीची वाढ जेवढी व्हायला पाहिजे तेवढी होत नाही. उन्हाळ्यामध्ये देखील पाण्याचा जर स्रोत चांगला असेल तर कोथिंबिरी या पिकाची लागवड करून जास्तीत जास्त नफा मिळवता येतो. उन्हाळ्यामध्ये जर तापमान हे 35 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असेल तरच कोथिंबीरची वाढ ही कमी होत असते. त्याचबरोबर पावसाळ्यात देखील अति पाऊस असेल तरीसुद्धा कोथिंबीरची वाढ जशी पाहिजे तशी होत नाही. तसं बघितलं तर कोथिंबीर कोणत्याही हवामानामध्ये चांगली येते आणि चांगल्या प्रमाणात नफा देखील मिळतो.

कोथिंबीर लागवड करण्याची पद्धत

कोथिंबिरीची लागवड करायची म्हणल्यानंतर सर्वात प्रथम आपण जमीन कशी आहे ते बघायला पाहिजे आणि त्यानंतरच प्लॅन करावा. कोणतीही जमीन असं कोथिंबिरीची लागवड करण्या अगोदर ती जमीन नांगरून चांगली भुसभुशीत करून घेतली पाहिजे.कोथिंबीर लागवड करण्याआधी जमीन चांगले भुसभुशीत केल्याने कोथिंबीर हे पीक चांगले येते. जमीन भुसभुशीत केल्यानंतर त्या जमिनीमध्ये चांगले कुजलेले शेणखत टाकून घ्यावे. शेणखत किती टाकावे हा प्रश्न आपल्या मनात पडला असेल. जर जमीन ही एक एकर असेल तर त्या मध्ये 6 ते 8 टन चांगले कुजलेले शेणखत टाकून घ्यावे. म्हणजेच एकरी सहा ते आठ शेणखत टाकून घ्यावे. त्यानंतर जर कोथंबीर वाफ्यामध्ये लावायचे असेल तर सपाट वाफे करून घ्यावे. वाफ्याचा आकार हा 3*2 मीटर घ्यावा.
या वाफेमध्ये जर कोथिंबीरीची लागवड ही बी फेकून करायची असेल तर मी फेकताना सगळीकडे सारखे पडेल याची काळजी घ्यावी. जर आपल्याला बी फेकून लागवड करायची नसेल तर त्या वाफ्यामध्ये 15 सेंटीमीटर अंतरावर खुरप्याने पोळी काढून त्यात सुद्धा आपण बी पेरून कोथिंबीर या पिकाची लागवड करू शकतो.
जर आपण कोथिंबीर या पिकाची लागवड उन्हाळ्यामध्ये करत असला तर केलेले वाफे लागवड करण्या अगोदरच भिजून घ्यावे. आणि नंतर वापसा झाल्यानंतर त्यात कोथिंबीर या पिकाची लागवड बी फेकून किंवा खुरप्याने ओळी पाडून त्यामध्ये बी टाकून कोथिंबीर या पिकाची लागवड करू शकतात.

कोथिंबिरीची लागवड करण्यासाठी एकरी किती बियाणे लागते

कोथिंबिरीची एकरी लागवड करण्यासाठी लागणारे बी 25 ते 35 किलो आहे. एका एकरमध्ये 25 ते 35 किलो पर्यंत बियाण्यांचा वापर केला जातो. कोथिंबीरीची बी म्हणजे धने आहेत. तेच धने लागवड करण्याआधी हळुवार रगडून घ्यावे. म्हणजे त्यातील बी वेगळे करावे. जर कोथिंबीर या बियाणांची भूगोल ही आठ ते दहा दिवसांमध्ये करायचे असेल तर ते बी लावण्या अगोदर भिजून गोणपाटात गुंडाळून ठेवावे. कोथिंबिरीचे बी गोणपाटात गुंडाळून ठेवल्याने कोथिंबीरीच्या उत्पादनात वाढ झालेली बघायला मिळते. त्याचबरोबर कोथिंबीरीची काढणी सुद्धा लवकर होते.

कोथिंबीर या पिकाची लागवड करण्याबरोबरच त्यासाठी किती खत लागते व पाणी व्यवस्थापन

कोणत्याही पिकाची लागवड करत असताना त्याला खत आणि पाणी या दोन्हीची ही गरज असते. तसेच आता आपण पाहूया की कोथिंबीर या पिकासाठी लागणारे खत. कोथिंबीरीची लागवड करायची असल्यास जमिनीमध्ये 6 ते 8 टन चांगले कुजलेले शेणखत एकरी जमिनीमध्ये घालावे लागते. त्याच्यानंतर कोथिंबीरीची बी उगवल्यानंतर वीस दिवसांनी 40 किलो नत्र हेक्‍टरी द्यावे लागते. 100 लिटर पाण्यामध्ये 250 ग्रॅम युरिया मिसळून त्याच्या दोन फवारण्या या बी उगवल्यानंतर 25 दिवसांनी करायला पाहिजे. या फवारण्यामुळे कोथिंबीरीची वाढ ही चांगली व्हायला मदत होते. कोथिंबीर या पिकासाठी किती प्रमाणात पाणी असणे गरजेचे आहे हे पाहू. कोथंबीर या पिकाला पाणी हे गरजेचे असते. परंतु जर आपण कोथिंबीर या पिकाची लागवड उन्हाळ्यामध्ये केलेली असेल तर दर 5 ते 6 दिवसानंतर पाणी द्यावे लागते. जर कोथिंबीर या पिकाची लागवड हिवाळ्यामध्ये केलेली असेल तर त्या पिकाला 8 ते 10 दिवसांनी पाणी देणे गरजेचे असते. असे केल्याने कोथिंबीर हे पीक चांगले येते. त्यातून आपण जास्त नफा मिळू शकतो.

कोथिंबीर या पिकाची काढणी कधी करावी

कोथिंबीर हे पीक काही थोड्या दिवसांमध्ये येत असते. कोथिंबीर हे पीठ थोड्या दिवसांमध्ये येऊन चांगला नफा देणारे पीक आहे. कोथिंबिरीची लागवड केल्यानंतर 35 ते 40 दिवसांनी कोथिंबीर 15 ते 20 सेंटीमीटर उंचीची होते. म्हणूनच कोथिंबीर या पिकाची काढणी 35 ते 40 दिवसांनी करायला पाहिजे. कोथिंबिरी लागवडीच्या नंतर दोन महिन्यांनी कोथिंबीरला फुले यायला सुरुवात होते ते फुले येण्याअगोदरच कोथंबिरीची काढणी करणे गरजेचे असते. तरच आपण कोथिंबीर या पिकातून चांगला नफा मिळवू शकतो.Busniess Idea

Sharing Is Caring:

Leave a Comment