Pithachi Girani: पिठाच्या गिरणी या छोट्याशा व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती

Pithachi Girani: नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये एका छोट्या घरगुती व्यवसायाबद्दल माहिती पाहणार आहोत. आपणही घरगुती छोटा व्यवसाय करण्यासाठी उत्सुक असाल किंवा करण्याची इच्छा असेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा कारण यामध्ये संपूर्ण माहिती ही महत्त्वाची त्याचबरोबर फायद्याची आहे.

आपण पाहतो सध्याच्या या दैनंदिन जीवनामध्ये सर्वजण हे घरगुती व्यवसाय कडेच जास्त वळताना बघायला मिळतात. महिलांना जास्त करून घरगुती व्यवसाय करण्याची इच्छा असते कारण त्यांना शेतामध्ये काम करण्याची इच्छा नसते. दिवसेंदिवस महिलांची शेतामध्ये काम करणाऱ्यांची संख्या ही थोडीशी कमी होत चाललेली आहे. प्रत्येक महिलेला आपल्या घरगुती छोटा का होईना व्यवसाय असावा असे वाटते. काही महिला ह्या शेतातील काम करून देखील घरगुती छोटा व्यवसाय करतात. तो व्यवसाय म्हणजेच गिरणी चालवणे. आपण पिठाचा व्यवसाय हा घरगुती व्यवसाय म्हणून करू शकतो. त्याचबरोबर आपल्या घरी छोटी गिरणी असली तरीसुद्धा आपण आसपासच्या दहा-बारा घरातील दळण हे दळून देऊ शकतो. शेतातील कामाबरोबरच या घरगुती व्यवसायामधून देखील भरपूर महिला थोडा नफा मिळवत असतात.

महिलांना पैसे कमावण्याची खूप इच्छा असते त्याचबरोबर प्रत्येक महिलेला आपल्याकडे थोडे का होईना पण पैसे असावे असे वाटते त्यामुळे महिलाही काही ना काही काम करते. महिला ह्या कोणताही व्यवसाय असो त्या व्यवसायामध्ये काम करण्यासाठी तयार असतात. पिठाची गिरणी चालवण्यासाठी जास्त काही मेहनत लागत नाही त्यामुळे हा व्यवसाय अगदी सोप्या पद्धतीने महिला करू शकतात आणि त्यातून त्या स्वतःला पैसे कमवतील.

आज काल आपण पाहत आहोत सर्वजण हे पीठ त्याचबरोबर मिरच्या पासून ची चटणी तयार होते ती देखील बाहेरून कुठून आणत आहेत. ती चटणी उठवण्यासाठी देखील एक गिरणीची किंवा एक यंत्र वापरले जाते ते यंत्र देखील आपण आपल्या पिठाच्या गिरणी शेजारी ठेवून अजूनच चांगले पैसे मिळू शकतो. महिलांना घरगुती बसल्या बसल्या एका सोबतच दुसऱ्या व्यवसाय देखील करता येईल. आणि त्या व्यवसायामधून त्या महिला घरबसल्या पैसे कमवतील. आपण दोन्ही व्यवसाय एका ठिकाणी थोड्या अंतरावर करून त्यामधून आपला घर खर्च भागवू शकतात. काही महिला या शेतातील कामे बघून हे दोन्ही व्यवसाय देखील घरी आल्यानंतर करत असतात. हे छोटे घरगुती व्यवसाय खूप चांगले आहेत ज्यांना की घरगुती व्यवसाय करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी त्याचबरोबर त्यामधून आपण आपला घर खर्च तसेच आपल्या स्वतःजवळ काही पैसे देखील ठेवू शकतात.Pithachi Girani

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःची गिरणी आणावी लागते त्याचबरोबर जर त्यासोबतच आपल्याला चटणी देखील कुटायचे असेल तर त्याचे सुद्धा एक यंत्र आपल्याला स्वतःला घ्यावे लागते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला स्वतःच्या पैशाची गुंतवणूक करावी लागते. जरी आपल्याला स्वतःच्या पैशाची गुंतवणूक करावी लागत असली तरी सुद्धा ते आपल्यासाठी त्याचबरोबर आपल्याला एक व्यवसाय करण्यासाठी हे खूप फायद्याचे आहे. जर गिरणी किंवा चटणी कुटण्याचे यंत्र आपण स्वतःच्या पैशाची खरेदी केले तरीसुद्धा ती वाया जाणारी वस्तू नाही. तसेच आपण हा घरगुती व्यवसाय म्हणून करू शकतो आणि आपण आपल्या स्वतःला लागणारे पीठ किंवा चटणी देखील त्यातून काढू शकतो. त्यामुळे आपला बाहेर जाण्याचा त्रास वाचतो. एखादी वेळेस आपल्याला बाहेर जाण्यासाठी वेळ नसतो तर आपल्याला पीठ किंवा चटणी वेळेवर मिळत नाही. जर आपली स्वतःची गिरणी असेल तर आपण आपल्याच घरी पाहिजे तेव्हा पीठ किंवा चटणी काढू शकतो. आपण आपल्या घरीच ही गिरणी आणल्यामुळे आपला बाहेर जाण्याचा वेळ देखील वाचेल.

आपल्या घरी पिठाची गिरणी त्याचबरोबर चटणी कुटण्याचे यंत्र ठेवण्याएवढी जागा असेल तर नक्कीच आपण हा व्यवसाय करू शकता. हा व्यवसाय करण्यासाठी आपल्याला घरीच राहावे असे काही नाही आपण शेतात जाऊन देखील हा व्यवसाय करू शकतो. तसेच जर आपल्याला शेतातील काम तसेच इतर कोणतेही काम असेल तरीसुद्धा आपण ते काम करून घरी आल्यानंतर हा छोटासा व्यवसाय करून त्यामधून चांगल्या प्रमाणात पैसे मिळू शकतो. जर आपल्याला या व्यवसायामधून येणारे पैसे हे वरची वर येत राहिले तर आपल्याला घरात पैशाची कमी देखील पडणार नाही. त्या आलेल्या पैशांमधून आपण आपल्या घरचा खर्च त्याचबरोबर आपल्याला लागणारी वस्तू खरेदी करू शकतात.

पिठाची गिरणी त्याचबरोबर चटणी कुटण्याचे यंत्र हे फक्त महिलाच चालवतील असं देखील नाही. एखाद्या घरामध्ये महिलांना काम असतात तर पुरुष मोकळे असतात. ही पिठाची गिरणी आणि चटणी कुटण्याची मशीन हे पुरुषांना देखील चालवता येते. हा छोटासा घरगुती व्यवसाय महिला किंवा पुरुष कोणीही करून यातून चांगले पैसे मिळू शकतात.

महिलांना शेतातील त्याचबरोबर घरातील कामे असतात. महिला ही सर्व बाकीची कामे बघून सुद्धा दुसरा छोटा मोठा व्यवसाय करण्याचे ठरवतात. घरात जर एखादा छोटासा व्यवसाय करायचा म्हणलं तर सुरुवात केल्यानंतर हळूहळू तो चांगला चालू लागतो. पिठाची गिरणी हा व्यवसाय महिला त्याचबरोबर पुरुषांसाठी देखील चांगला आहे. पिठाची गिरणी चालवायची शिकल्यानंतर हा व्यवसाय कोणी सुद्धा करू शकते. पीठ हे दैनंदिन जीवनामध्ये वापरले जाणारे आहे. प्रत्येक घरामध्ये पिठाची गरज आहे त्यामुळे हा व्यवसाय चांगल्या प्रमाणात चालतो. आपण पाहतो प्रत्येकाच्या घरी ही पिठाची गिरणी नसते त्याचबरोबर चटणी कुटण्याची मशीन देखील नसते त्यामुळे हे दोन्ही व्यवसाय आपण एक घरगुती व्यवसाय म्हणून करू शकतो. चटणी पीठ हे आपल्याला रोजच्या जीवनामध्ये वापरले जाणारे पदार्थ आहेत. त्यामुळे याची सर्वांना अतिशय गरज असते. सगळ्यांच्याच घरी गिरणी नसल्यामुळे हा छोटासा व्यवसाय चांगल्या प्रमाणात करता येतो.
पिठाची गिरणी हा छोटासा व्यवसाय आपण चालू केला तर आपला चांगला प्रमाणामध्ये फायदा होतो. आपल्याकडे जर शेती नसेल आणि आपण शेतातील कामे करू शकत नाही तर आपण पिठाची गिरणी हा छोटासा व्यवसाय करून आपला घर खर्च भागवू शकतात. ज्या व्यक्तीला शेतातील कामे त्याचबरोबर इतर कोणतेही काम जमल्यामुळे पिठाची गिरणी हा व्यवसाय सुरू केला आहे.

पिठाच्या गिरणी सोबतच आपल्याला अजून एखादा नवीन जोडधंदा करण्याची इच्छा होत आहे तर तो कोणता करावा याबद्दल जाणून घेऊ. आपण पाहतो खेड्यापाड्यांमध्ये पिठाच्या गिरणीला जोडधंदा म्हणून आणखी वेगवेगळ्या गिरणी त्याचबरोबर मशीन खरेदी करून आपण वेगवेगळे मसाले त्याचबरोबर चटणी कुठून देऊ शकतो. मसाले दळणे त्याचबरोबर चटणी कुटणे हे पिठाच्या गिरणी सोबत करता येणारे जोडधंदे आहेत. आपण पाहतो काही ठिकाणी काही व्यक्तींना तांदुळाच्या पिठाचे देखील वापर करताना दिसते. तसेच काही ठिकाणी जे थालीपीठ असते त्या थालीपीठाच्या पिठाचा देखील वापर करतात ,त्याचबरोबर नाचणीचे पीठे देखील बऱ्याच घरांमध्ये वापरली जातात. ही पीठे आपल्यासाठी फायद्याची आहेत. तसेच आपण पिठाची गिरणीला जोडधंदा म्हणून ही इतर पीठे देखील दळण्याचा व्यवसाय करू शकतो. त्याचबरोबर तांदुळाची नाचणीचे पीठ हे दळून नंतर ते पॅक करून विकू सुद्धा शकतो. जर आपण हे पीठ दळून विकण्याचे ठरवले तर आपण त्या पिठाचे पॅक देखील बनवू शकतो. हे पीठ पॅक करून विकण्याचा देखील उद्योग आपल्याला करता येईल.

पिठाची गिरणी हा व्यवसाय करून महिला या पिठाचा गिरणीच्या माध्यमातून स्वतःला लागणारा खर्च त्याचबरोबर स्वतःचा एक घरगुती उद्योग सुरू करू शकतात. त्याचबरोबर ज्या महिलांना काही काम नाही त्या महिलांना काम मिळेल. या व्यवसायामधून ज्या ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या महिला आहेत त्या महिलांच्या उत्पादनामध्ये वाढ होईल. आपण पाहतो की काही दिवसापूर्वी पिठाची मोफत गिरणी मिळणार अशी एक योजना निघाली होती. ही योजना जर अजून पर्यंत चालू असेल आणि त्यातून आपल्याला देखील पिठाची गिरणी मिळाली तर आपण सुद्धा हा व्यवसाय बिनधास्तपणे चालू करू शकता. जर तुम्हाला योजनेमार्फत मोफत पिठाची गिरणी मिळाली तर तुमचा जो अगोदर खर्च होणार आहे तो देखील होणार नाही त्यामुळे आपल्याला अजूनच या व्यवसायामध्ये आवड निर्माण होईल. महिलांनी जर हा छोटासा घरगुती व्यवसाय केला तर त्यांना बाहेर कुठे कामासाठी जाण्याची गरज देखील पडणार नाही. पिठाची गिरणी या व्यवसायामधून बरेचसे लोक खूप पैसे कमवत असतात. परंतु पिठाची गिरणी हा व्यवसाय अशा ठिकाणी करावा ज्या ठिकाणी प्रथम किंवा पहिली पिठाची गिरणी नाही. जर तुम्ही जिथे पहिली गिरणी आहे तिथेच हा व्यवसाय चालू करत असाल तर आपल्याकडे जास्त व्यक्ती हे दळण नेण्यासाठी येणार नाहीत त्यामुळे आपल्याला जास्त पैसे उरणार नाहीत. ही होती पिठाच्या व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती.Pithachi Girani

Sharing Is Caring:

Leave a Comment