Mukhymantri Maji Ladaki Bahin: नमस्कार मित्रांनो, आपण आज या बातमीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नियम? मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा कोणत्या महिलांना फायदा होतो? या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडे कोणकोणते कागदपत्रे असणे आवश्यक आहे? या योजनेचा लाभ महिलांना किती दिला जातो? या योजनेअंतर्गत महिलांना किती हप्त मिळाले आहेत ? या योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार? ज्या महिलांना या योजनेत नाही त्यांनी काय करावे? अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा.
सर्वात सुरुवातीला आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची सुरुवात कोणी केली. कधी केली ? कोणत्या सरकारने केली ? कोणत्या बजेटमध्ये केली ? अशी थोडक्यात माहिती पाहूया…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात ही महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केली आहे. त्याचबरोबर या योजनेची अंमलबजावणी ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली आहे. त्याचबरोबर या योजनेची घोषणा ही सरकार द्वारा २०२४-२५ चे बजेट वाचताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नियम?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलेचे वय हे अठरा वर्ष ते साठ वर्षे दरम्यान असावे. म्हणजेच 18 ते 60 वर्षा दरम्यान असलेल्या महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येतो. त्याचबरोबर अर्जदार महिलाही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
त्याचबरोबर महिन्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाख 50 हजार रुपयांपेक्षा कमी असावे. त्याच बरोबर अर्जदार महिलेला दुसऱ्या कोणत्याही सरकारी योजने पासून एक हजार पाचशे रुपये महिना मिळत नसावा. या सर्व नियमांमध्ये महिला बसत असेल तर त्या महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी महिला कशा पद्धतीने अर्ज करू शकतात?
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे महिला त्यांच्या मोबाईल मधील प्ले स्टोअर वर जाऊन नावी या एप्लीकेशन वर जाऊन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकतात.
त्याचबरोबर महिला ऑफलाईन पद्धतीने देखील या योजनेचा अर्ज करू शकतात. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी महिलेला सर्व कागदपत्रे अंगणवाडी म्हणजेच आशा सेविका यांच्याकडे जमा करावे लागतील. त्यानंतर आशा सेविका महिला व बालविकास कार्यालयामध्ये कागदपत्रे जमा करतील. आणि त्यानंतर अर्जदार महिलेला या योजनेचा लाभ दिला जाईल. परंतु या योजनेत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ही अत्यंत सोपी आहे यामुळे सर्व महिला ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईल वरून देखील अर्ज करू शकतात.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेला कोणकोणते कागदपत्रे लागतात ?Mukhymantri Maji Ladaki Bahin
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी महिलेकडे खाली दिलेल्या सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
1 आधार कार्ड 2 राशन कार्ड 3 आय प्रमाण पत्र 4 बँक खात्याचे पासबुक 5 जात प्रमाणपत्र
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिला कधी दिला जाईल ?
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलेला ऑगस्ट महिन्यामध्ये दिला गेला आहे. शिंदे सरकारकडून ऑगस्ट महिन्यामध्ये 17 तारखेला सर्व पात्र महिलांच्या तीन हजार रुपये जमा करण्यात आले होते. हे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात दोन हप्त्याचे एकत्रित जमा करण्यात आले होते.
त्याचबरोबर ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळाले नाहीत अशा महिलांना आता एकत्रित 4500 रुपये दिले जाणार आहेत. असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. त्याचबरोबर ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळाले होते त्यांना सुद्धा सप्टेंबर महिन्यामध्ये 1500 रुपये आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिले जाणार आहे. यामुळे महिलांसाठी ही एक खूपच आनंदाची बातमी आहे.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कधी सुरू झाली?
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना 2024 साली सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर ही योजना केवळ राज्य सरकार द्वारे सुरू करण्यात आले असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर या योजनेची अंमलबजावणी ही 28 जून 2024 रोजी (शुक्रवारी) अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आली होती.
ही योजना सुरू केल्यानंतर लगेचच महिलांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. या योजनेत 29, ३० त्याचबरोबर पुढील दोन ते तीन दिवस नवनवीन बदल करण्यात आले. कारण ही योजना सुरू केल्यानंतर लगेचच महिला अर्ज करण्यासाठी सरकारी कार्यालयामध्ये गर्दी करू लागल्या. आणि वाढत्या गर्दीमुळे अनेक सुरू असलेले सरकारी कामे बंद होऊ लागली. यामुळे या योजनेत सातत्याने बदल करण्यात आले.
त्याचबरोबर आतापर्यंत केलेल्या योजनांपैकी ही एक सर्वात मोठी आणि महिलांसाठी लाभदायक योजना आहे. त्याचबरोबर या योजनेचा प्रसार हा दोनच दिवसात खूपच मोठा झाला. यामुळे ही योजना महिलांसाठी वरदान ठरवू लागली. कारण या योजनेद्वारे पात्र महिलांना 1500 रुपये महिन्याला मिळणार होते. आणि याच कारणामुळे या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या जास्त राहिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज कधी सुरू झाले ?
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही योजना राज्य सरकारकडून 28 जून 2024 रोजी सुरू करण्यात आली. आणि त्यानंतर लगेचच एक जुलैपासून या योजनेसाठी अर्ज मागविण्यात आले. आणि अर्ज मागविण्यात आल्यानंतर लगेचच महिलांनी सीएससी सेंटर तसेच सरकारी केंद्रांवर धडक मारली. आणि यानंतर अनेक सरकारी कामे बंद होऊ लागली. यामुळे सरकारने अगोदरच अनेक नियम बदललेले होते.
परंतु सरकारी कामांना अडथळा येत असल्यामुळे सरकारने दोनच दिवसात. या योजनेला अर्ज करण्यासाठी नवीन ॲप बनवण्यात आली. आणि या नवीन या द्वारे महिलांना अर्ज कसा करायचा याबद्दल युट्युब, इंस्टाग्राम, व्हाट्सअप, टिव्ही चैनल तसेच इत्यादी सोशल मीडियावर माहिती प्रसारित केली. आणि या माहितीच्या द्वारे महिला घरी बसून त्यांच्या मोबाईलवरून सहज आणि सोप्या पद्धतीने अर्ज करू लागल्या.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट ठेवण्यात आली होती. या वेळापर्यंत अनेक महिलांचे अर्ज झाले नव्हते. आणि याच कारणामुळे सरकारकडून अजून वेळ मागवण्यात आली. आता सरकारने या योजनेची अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर ठेवण्यात आली आहे. यामुळे राहिलेल्या सर्व महिलांनी या योजनेसाठी लवकरात लवकर अर्ज करावा.
कारण 30 सप्टेंबर नंतर पुन्हा तारीख वाढून मिळेल अशी अपेक्षा करू नका. अनेकांना आशा असते की, सरकार या योजनेची शेवटची तारीख लांबवणार आहे. परंतु अचानक सरकारचे नियम बदलू शकतात. यामुळे तुम्ही या योजनेसाठी लवकरात लवकर अर्ज करा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 2025 पर्यंत महिलांना किती लाभ होईल ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दोन हप्त्याचे एकत्रित तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. म्हणजेच मित्रांनो जुलै महिन्यातील एक हजार पाचशे रुपये आणि ऑगस्ट महिन्यातील एक हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आता दर महिन्या एक हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जाणार असल्यामुळे मुलांना डिसेंबर महिन्या पर्यंत किती रुपये मिळतील. असा प्रश्न असा प्रश्न तुम्हालाही नक्कीच पडला असेल. चला तर मग या मागचे गणित जाणून घेऊया.
2025 वर्ष येण्यासाठी अजून 4 महिने बाकी आहेत. आणि आतापर्यंत सरकारकडून दोन महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. म्हणजेच महिलांना आतापर्यंत तीन हजार रुपये मिळाले आहेत. 2025 पर्यंत महिलांना चार हप्त्याचे सहा हजार रुपये अजून मिळणार आहेत. म्हणजेच महिलांना 2025 पर्यंत 6 हजार + 3000 हजार असे एकूण 9000 हजार रुपये मिळणार आहेत. यामुळे ही एक महिलांसाठी खूपच आर्थिक सहाय्य देणारी योजना ठरणार आहे.Mukhymantri Maji Ladaki Bahin