Ganapti Mahiti: अष्टविनायकाची संपूर्ण माहिती मराठी मधून

Ganapti Mahiti: अष्टविनायकाची संपूर्ण माहिती मराठी मधून

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये तुमच्या सगळ्यांच्या आनंदाची त्याचबरोबर ज्या गोष्टीची तुम्हाला उत्सुकता असते अशा बद्दल माहिती पाहणार आहोत. गणपती हे नाव ऐकताच सर्वांना अतिशय आनंद त्याचबरोबर मनात उत्सुकता निर्माण होते. प्रत्येक जण हा गणपती आगमनाची आतुरता देखील करत असतात. आपण पाहतो वर्षानुवर्षे गणपती उत्सव हा साजरा केला जातो. गणपती उत्सव साजरा करत असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती वेगवेगळ्या हावभाव त्याचबरोबर प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळीच उत्सुकता निर्माण झालेली असते त्या उत्सुकतेमध्ये आपण मोठ्या आनंदात गणपती उत्सव साजरा करत असतो.

गणपतीचे गणपती हे नाव कसे पडले त्याचबरोबर त्यांचे दुसरे अजून कोण कोणते नाव आहेत अष्टविनायक मंदिर कोठे कोठे आहेत अशी आपण सविस्तर माहिती या लेखांमध्ये पाहणार आहोत जी की आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. जर आपल्याला गणपती बाप्पांबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्याला हा लेख शेवटपर्यंत वाचावा लागेल. हा लेख शेवटपर्यंत वाचल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पा हे नाव कसे पडले व अष्टविनायक मंदिर कोठे कोठे आहेत हे नक्कीच माहिती होईल. याव्यतिरिक्त गणपती बाप्पांबद्दल अजून दुसरी माहिती सुद्धा या लेखांमध्ये देण्यात येईल.

सर्वांनाच माहित आहे गणपती बाप्पाला गणेश या नावाने देखील ओळखले जाते. परंतु गणपती बाप्पाचे अगोदर गणेश हे नाव होते त्यापासून गणपती हे नाव कसे पडले हे आपण जाणून घेऊ. आपण गणेश या शब्दांबद्दल कधी विचार केला नसेल म्हणून आपल्याला गणेश या शब्दाचा अर्थ देखील माहित नसतो तर पाहणार आहोत की गणेश या शब्दाचा अर्थ नेमका होतो काय. गणेश हा शब्द किंवा नाव प्रत्येकाने ऐकलेले आहे परंतु याचा अर्थ काय आहे हे माहीत नाही तर ते आता जाणून घेऊ. बघायला गेले तर गणेश या शब्दाचा अर्थ असा होतो की गणांचा ईश म्हणजेच गणेश वा प्रभू असा आहे. गणेश या शब्दांना जर फोडलं तर गण हा एक शब्द तयार होतो. गण म्हणजे काय तर गण म्हणजेच शिव व पार्वतीचे सेवक. गणेश हा गणांचा अधिपती असतो म्हणून त्यांना गणपती या नावाने देखील ओळखले जाते. आपण पाहतो दक्षिण भागामध्ये गणपती या देवतेस विनायक हे नाव वापरण्यात येते. प्रत्येक जण पप्पांना वेगवेगळ्या नावाने ओळखत आहे. ती नावे म्हणजेच गणपती,विनायक, गणेश आणि बप्पा.Ganapti Mahiti

चतुर्थी हा उपवास गणपती या देवतेचा म्हणून धरला जातो.तसेच चतुर्थीला गणपती या देवतेचे पूजन करून उपवास सोडला जातो. चतुर्थी म्हणलं की आपण वेगवेगळ्या ठिकाणांच्या गणपती या देवतेस पाया पडण्यासाठी जात असतो. माघ महिन्यातील चतुर्थीला माघी चतुर्थी का म्हटले जाते याबद्दल माहिती पाहणार आहोत. माघ महिन्यातील चतुर्थीला माघी चतुर्थी म्हणण्या मागचे कारण सुद्धा एक वेगळेच आहे. हे कारण जाणून घेण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांचा म्हणजेच गणरायांचा जन्म माहित असणे गरजेचे आहे. गणरायांच्या जन्मामध्येच या माघी चतुर्थीचे रहस्य दडलेले आहे. माघ महिन्यामध्ये जी चतुर्थी येते त्याच चतुर्थीला (गणेश) गणपती बाप्पांचा जन्म झालेला आहे. म्हणून या चतुर्थीला माघी चतुर्थी असे म्हणतात.

गणपतीला सगळी किती नावे आहेत हे आपण माहिती करून घेऊया.

आपल्याला गणपतीचे जास्तीत जास्त तीन ते चारच नावे माहीत असतील परंतु गणपतीला तेवढेच नावे नसून त्यापेक्षा जास्त नावे आहेत. गणपतीचे जे अष्टोत्तर शतनामावली आहे त्यामध्ये गणरायांचे भरपूर नावे आहेत. पूर्ण 108 गणरायांची नावे अष्टोत्तर शतनामावली मध्ये आहेत. सध्या आपण जास्तीत जास्त तीन ते चार नावांचा वापर करतो.

अष्टविनायक मंदिर कोठे आहे हे जाणून घेऊया –

अष्टविनायकांची मंदिरे म्हणजे नेमकं काय असतं हे आपण प्रथमता पाहू त्यानंतर अष्टविनायकांची मंदिरे कोठे कोठे आहेत हे पाहू. अष्टविनायक म्हणजेच गणपतीची मंदिरे आहेत. श्री गणेशाची मूर्ती ही दगडावरती कोरीव काम करून तयार केलेली असते. कोणत्याही देवाची मूर्ती तयार करत असताना कोरीव काम करूनच करण्यात येते. तसेच गणेशाची मूर्ती देखील कोरीव काम करून तयार केलेली आहे परंतु हे कोरीव काम करून निर्माण केलेल्या ज्या मूर्ती आहेत त्या मूर्ती ज्या ठिकाणी सापडल्या आहेत त्या ठिकाणी त्यांना एक विशिष्ट असे नाव देण्यात आले आहे. आणि त्या मूर्ती ज्या गावांमध्ये आहेत त्याच गावांमध्ये ठेवून त्यांची पूजा केली जाते. ज्या ठिकाणी दगडांवरती कोरिव काम करून मूर्ती वेगवेगळ्या ठिकाणी सापडल्या त्याच ठिकाणांना विशेष असे महत्त्व देण्यात आले. ती जी ठिकाणी आहेत त्यांनाच अष्टविनायक मंदिरे असे संबोधण्यात आले. तेच अष्टविनायक मंदिर कोठे कोठे आहेत हे आपण खाली पाहूया –
1) मोरगाव
2) रांजणगाव
3) थेऊर
4) पाली
5) सिद्धटेक
6) ओझर
7) लेण्याद्री
8) महड

या ठिकाणी आपल्याला श्री गणेशाची मंदिरे बघायला मिळतील. आणि या प्रत्येक ठिकाणी खूप छान असे श्री गणेशाची मूर्ती आहे. गणपतीचे दर्शन घेण्यासाठी बरेच लोक या सर्व ठिकाणी जाऊन येतात. जर आपल्याला गणपतीच्या वेगवेगळ्या मूर्ती बघायच्या असतील तर आपण नक्कीच या सर्व ठिकाणांना भेट द्यावी. या ठिकाणांना भेट दिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कोणत्या गणपतीची मूर्ती कशी आहे व ती कशी तयार झाली असेल याबद्दल आपण विचार करू. आता आपण खाली एका एका ठिकाणांची माहिती पाहूया कोणते ठिकाण कोठे आहे त्याचबरोबर ते ठिकाण किती दूर आहे याबद्दलची माहिती बघू.Ganapti Mahiti marathi

महाराष्ट्रामध्ये जी आठ ठिकाणी आहेत त्या ठिकाणांना मानाची व प्रतिष्ठेची श्री गणेशाची देवळे आहेत त्यांना अष्टविनायक असे म्हणले जाते. या अष्टविनायकांची ओळख फक्त महाराष्ट्रात नसून संपूर्ण भारतात ते प्रसिद्ध आहेत. या आठही ठिकाणांना विशेष असे महत्त्व दिले जाते. आणि या आठही ठिकाणी श्री गणेशांच्या मूर्ती आहेत आणि त्या मूर्तींना सुद्धा खास महत्त्व आहे. आपण पाहतो श्री गणेशाला विद्येची देवता असे म्हटले जाते. प्रत्येक गणेश भक्तांची एक भावना आहे ती म्हणजेच गणपती हा विद्येची देवता असून त सुखकर्ता, दुखहर्ता आणि रक्षणकरता देखील आहे. प्रत्येक गणेश भक्त हा मोठ्या उत्साहाने या अष्टविनायकांच्या यात्रेमध्ये देखील सहभागी होतो. आनंदाने जल्लोषाने या अष्टविनायकांची पूजा व दर्शन करतो.

अष्टविनायकांची मंदिरे कोठे आहेत हे आपल्याला माहिती झाले परंतु या मंदिराचा क्रम देखील माहित असणे खूप गरजेचे आहे. तर आपण आता जाणून घेऊया अष्टविनायक दर्शनाचा क्रम आणि त्या असणाऱ्या अष्टविनायक मंदिरांमधला अंतर. त्याचप्रमाणे जर आपण अष्टविनायक मंदिराचे दर्शन घ्यायचे ठरवले तर ते दर्शन कसे करावे हे देखील आपण जाणून घेऊ.

1) मोरगाव
मोरगावच्या गणपतीला पहिला गणपती म्हणून ओळखले जाते. जर आपल्याला अष्टविनायकांचे दर्शन घ्यायचे असेल तर आपण सुरुवात मोरगाव पासून करावे. मोरगावच्या गणपतीचे नाव श्री मयुरेश्वर आहे. श्री मयुरेश्वर या गणपतीचे मंदिर खूप छान आहे. मोरगाव हे गाव पुणे जिल्ह्यामध्ये आहे.

2) सिद्धटेक

सिद्धटेकच्या गणपतीला दुसरा गणपती म्हणून ओळखले जाते. जर आपण पहिले मोरगावचे दर्शन घेतले तर त्यानंतर सिद्धटेक च्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जावे. सिद्धटेक हा देखील अष्टविनायक मधील एक ठिकाण आहे. सिद्धटेक च्या गणपतीला श्री सिद्धेश्वर म्हणून ओळखले जाते.

3) पाली

तिसरा गणपती म्हणून पालीच्या गणपतीला ओळखले जाते. जर क्रमानुसार अष्टविनायकांचे दर्शन घ्यायचे म्हणले तर तिसऱ्या नंबरला पाली हे ठिकाण येते. जर आपण क्रमानुसार दर्शन घेतले तर त्यामधील अंतर देखील कमी कमी होते. पालीच्या या श्री गणेशाच्या मूर्तीला श्री बल्लाळेश्वर म्हणून ओळखले जाते.

4) महाड

महाडचा गणपती हा चौथा नंबर ला येतो. महाडच्या गणपतीचे नाव श्री वरदविनायक आहे. महाड हे गाव रायगड जिल्ह्यामध्ये येते.

5) थेऊर

थेऊरचा गणपती हा पाचवा गणपती आहे. थेऊरच्या गणपतीचे नाव श्री चिंतामणी असे आहे. थेऊर हे देखील पुणे जिल्ह्यामध्ये येते.

6) लेण्याद्री

लेण्याद्रीच्या गणपतीचा सहावा नंबर आहे. लेण्याद्रीच्या गणपतीचे नाव हे श्री गिरीजात्मक असे आहे.

7) ओझर

सातवा गणपती बघायचा म्हणले तर ओझर या ठिकाणी आहे. ओझरच्या गणपतीचे नाव श्री विघ्नेश्वर आहे.

8) रांजणगाव
आठवा गणपती रांजणगावला आहे. रांजणगावचा श्री महागणपती आहे. ही आहेत अष्टविनायक मंदिरे.Ganapti Mahiti

Sharing Is Caring:

Leave a Comment