Mofat Favara: नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. सरकारने एक नवीन योजना काढलेले आहे ती म्हणजेच मोफत बॅटरी फवारणी पंप योजना. या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत, या योजनेचे उद्दिष्टे काय आहेत ,बॅटरी फवारणी पंप चे फायदे कोणकोणते आहेत त्याचबरोबर मोफत बॅटरी फवारणी पंप मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आणि अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे या सर्व गोष्टीची माहिती आपण आज या लेखांमध्ये पाहणार आहोत या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
कृषीप्रधान देश म्हणून भारत या देशाला ओळखले जाते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. भारत देशामध्ये जे ग्रामीण भाग आहेत या ग्रामीण भागामध्ये शेती हा व्यवसाय प्रामुख्याने केला जातो. शेती करत असताना शेतकऱ्यांना भरपूर अडचणी येत असतात त्याचबरोबर शेतीमध्ये कधी चढ तर कधी उतार येतो. शेतकऱ्यांना शेती करणे हे कधी परवडते तर कधी त्या पिकांमधून काही सुद्धा फायदा होत नाही. यामुळेच सरकार नवनवीन योजना राबवताना आपल्याला बघायला मिळते. तसेच एक नवीन योजना म्हणजेच मोफत बॅटरी फवारणी पंप योजना ही एक नवीन योजना राबविण्यात आलेली आहे. बॅटरी फवारणी पंप घेण्यासाठी सरकार हा 100 टक्के अनुदान देणार आहे. सरकारलाही एक गोष्ट माहित आहे जर देशातील शेतकरी सुखी असेल तरच देशाला व्यवस्थितरित्या अन्न पुरवले जाईल याबद्दलची माहिती सर्वांनाच आहे. अन्नदाता म्हणूनच शेतकऱ्याला ओळखले जाते. जर शेतकऱ्याने शेती पिकवली नाही आणि शेती मधून काही पीक आले नाही तर देशाला सुरळीत अन्नपुरवठा होणार नाही. भारत सरकार हा शेतकऱ्यांसाठी सतत काही ना काही नवनवीन उपक्रम राबवण्याचे बघते. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने आतापर्यंत वेगवेगळ्या योजना अमलात आणलेल्या आहेत हे आपल्या सर्वांनाच माहित आहे आणि त्या योजनेचा लाभ देखील भरपूर शेतकऱ्यांना झालेला आहे. कोणतीही योजना असेल तर त्या योजनेसाठी पात्रता व अटी दिलेल्या असतात. केंद्र सरकारने अमलात आणलेल्या योजनेचा देखील शेतकरी मोठ्या प्रमाणात लाभ घेताना पाहायला मिळतात. उदाहरणार्थ एक शेतकरी एक डीपी योजना, ट्रॅक्टर योजना, पीएम किसान योजना, ठिबक सिंचन अनुदान योजना, शेतकरी सन्मान योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ,नाविन्यपूर्ण योजना अशा वेगवेगळ्या योजना केंद्र सरकारने राबविलेल्या आहेत. या योजनेमधून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होताना देखील आपल्याला बघायला मिळतो.
शेतकऱ्याला शेती करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येत असतात आणि त्या अडचणीवर मात करण्यासाठीच केंद्र सरकार त्याचबरोबर राज्य सरकार हे नवनवीन योजना अमलात आणत असतात. शेतकऱ्याला एखादे यंत्र खरेदी करायचे असेल तर त्यासाठी शेतकऱ्याकडे जर पैसे नसतील तर शेतकरी ते यंत्र खरेदी करत नाही म्हणूनच तर राज्य सरकार त्या यंत्रावरती अनुदान देत आहे. शेतकऱ्यांची शेतीतील कामे कमी करण्यासाठी राज्य सरकार मदत करताना बघायला मिळते. शेतकऱ्यांना जे शेतात लागणारे यंत्र महाग आहे ते विकत घेता येत नाही त्यामुळेच राज्य सरकार नवनवीन योजना राबवत असते.
मोफत बॅटरी फवारणी यंत्र या योजनेविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया
राज्य सरकारने अमलात आणलेल्या या योजनेचे नाव मोफत बॅटरी फवारणी पंप योजना असे आहे आणि ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेसाठीचे जिल्हा वरती आहेत ते राज्यातील शेतकरी आहेत. या योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल तर त्या अर्जाची प्रक्रिया ही ऑनलाईन आहे. या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर या योजनेला अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट 2024 आहे या तारखेच्या अगोदर अर्ज करून घ्यावा.Mofat Favara
या योजनेचे उद्दिष्टे काय आहेत हे जाणून घेऊ.
मोफत बॅटरी फवारणी पंप योजना ही राज्य सरकारने राबवलेली आहे त्याचबरोबर या योजनेचे उद्दिष्टे कोणकोणते आहेत ते पाहू. या योजनेचा मुख्य उद्दिष्ट म्हणजेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे होय. कारण या यंत्रावर 100% अनुदान प्रदान केल्यामुळे शेतकऱ्यावर जो आर्थिक भार आहेत तो कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर या फवारणी पंपाच्या साह्याने आपण पिकावर ती जी कीटकनाशकांची फवारणी करतो ती फवारणी करण्यासाठी मदत होईल म्हणजेच पिकांवरील रोगराई नियंत्रित राहण्यासाठी मदत होईल. या पंपाच्या साह्याने पिकांवरील रोगराई कमी केल्यामुळे शेतीतून मिळणारे जे उत्पन्न आहे त्या उत्पादनामध्ये देखील वाढ होईल.
या पंपाच्या साह्याने जर फवारणी केली तर शेतकऱ्यांना शारीरिक कष्ट देखील कमी करावे लागेल. कारण पारंपारिक पंपाद्वारे जी औषध फवारणी आपण करायचो त्यासाठी शेतकऱ्यांना जास्त मेहनत लागत होती. पिकांवरील रोगराई कमी होईल त्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होईल आणि शेतीमध्ये खर्च कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होईल.
मोफत बॅटरी फवारणी पंप योजनेचे शेतकऱ्यांसाठी कोणकोणते फायदे होतील ते
खालील प्रमाणे
या फवारणी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक बचत होईल. उत्पादनामध्ये वाढ होताना दिसून येईल. पिकांवर जी रोगराई होते त्या रोगराईंवर नियंत्रण राहील. शेतकऱ्यांना शेतीमध्ये जे कष्ट करावे लागतात ते कष्ट थोडे कमी करावे लागेल. शेती करण्यासाठी शेतीमध्ये थोडी सुधारणा होईल. शेती करत असताना शेतकरी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरत नव्हते तर आता शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. या पंपामुळे पीक संरक्षण देखील होईल. पिकावरती संरक्षण झाले आणि रोगराई दूर झाली तर शेतीमध्ये सुधारणा देखील होईल.
मोफत बॅटरी फवारणी पंप योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत ते पाहू
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड असणे सर्वप्रथम गरजेचे आहे. त्याबरोबर लाभार्थ्याचा रहिवासी दाखला असणे देखील अत्यंत गरजेचे आहे. या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर बँक खाते बुक देखील लागते. पासपोर्ट आकाराचा फोटो, 8 अ आणि सात बारा देखील लागतो. त्याचबरोबर जे पंप खरेदी करायचे आहे त्या खरेदी करायच्या पंपाचे कोटेशन, आणि मोबाईल क्रमांक हे वरी सांगितलेले सर्व कागदपत्रे असतील तरच आपल्याला या योजनेसाठी अर्ज करता येईल.
या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर पात्रता काय आहे याबद्दल माहिती जाणून घेऊ
या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदार म्हणजेच शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर मोफत बॅटरी फवारणी पंप योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तो शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असायला पाहिजे. ही योजना महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी साठी राबवण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या शेतकऱ्याकडे सातबारा व 8अअसणे देखील आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवायचा आहे त्या शेतकऱ्याकडे स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे म्हणजेच जो अर्ज करणार आहे त्या अर्जदार शेतकऱ्याकडे आधार कार्ड पाहिजे. या योजनेला अर्ज करण्यासाठी जो अर्जदार शेतकरी आहे त्याने हे सर्व कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे.
मोफत बॅटरी फवारणी पंप योजनेसाठी अर्ज कसा करायचा
या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपण जवळ असलेल्या सेतूवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतो. जर आपल्याला घरबसल्या ऑनलाईन अर्ज करायचा असेल आणि आपल्याला त्यातील जर माहिती असेल तर आपण महाराष्ट्र शासनाच्या “महा.डी.बी.टी” पोर्टलवरून अर्ज करू शकतात. जर आपल्या घराच्या जवळ सेतू असेल तर त्या ठिकाणी आपण या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे घेऊन गेल्यास ऑनलाईन अर्ज करता येईल किंवा जर आपल्याला जमत असेल तर आपण या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन देखील अर्ज करता येईल.
ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवलेली आहे. या योजनेचा फायदा शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात होईल. राज्यातील शेतकऱ्यांसाठी त्याचबरोबर पिकांचे संरक्षण आणि शेतीमध्ये असणारे जे पीक आहे त्या पिकाची गुणवत्ता वाढावी यासाठी राज्य सरकार हा नेहमी प्रयत्न करताना बघायला मिळतंय. शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी आणि शेतकरी ही त्याची प्रगती करू शकेल म्हणून राज्य सरकार सतत प्रयत्नशील राहते. पिकांवर असणारे कीड रोग आणि आपत्ती पासून शेतकऱ्यांचा बचाव करण्यात यावा म्हणून राज्य सरकार शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत करण्यासाठी प्रयत्नशील राहताना बघायला मिळते.या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर आपल्याकडे वरी सांगितलेली सर्व कागदपत्रे आवश्यक आहे त्याचबरोबर या योजनेसाठी असणारी जी पात्रता आहे त्या पात्रतेमध्ये देखील आपण सहमत असणे म्हणजेच पात्र असणे गरजेचे आहे. आपण या योजनेसाठी पात्र असाल तर नक्कीच या योजनेचा लाभ आपल्याला मिळेल. शेती करत असताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल त्याचबरोबर कमी खर्चात आणि कमी कष्टात चांगले उत्पन्न मिळेल.Mofat Favara