Magel tyala Vihir: मागील त्याला विहीर या योजनेबद्दल सविस्तर माहिती

Magel tyala Vihir: नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये एका नवीन योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. योजना म्हणले की त्यामध्ये काही ना काही हा शेतकऱ्यांना फायदा असतो हे आपल्या सर्वांना माहीत झालेले आहे. परंतु योजनेचा फायदा घेण्यासाठी त्या योजनेला काही अटी त्याचबरोबर पात्रता असतात त्यामध्ये आपण पात्र आहोत की नाही हे देखील माहित असणे गरजेचे आहे. आज आपण या लेखांमध्ये मागील त्याला विहीर या योजनेबद्दलची माहिती जाणून घेऊया. या लेखांमध्ये मागील त्याला विहीर या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे त्याचबरोबर या योजनेच्या असणाऱ्या अटी व पात्रता, या योजनेचा शेतकऱ्यांसाठी कोण कोणता फायदा होतो तसेच ही योजना राबविण्याचा मुख्य उद्देश काय आहे आणि या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आपल्यालाही मागेल त्याला विहीर या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायचे असेल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवल्या जात आहेत. त्यातीलच ही एक मागेल त्याला विहीर योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होईल त्याचबरोबर ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरेल. ग्रामीण भागातील शेतकरी हे स्वतःकडे पैसे नसल्यामुळे विहीर खोदण्याचे दुर्लक्ष करत असतात. ग्रामीण भागात राहणार शेतकऱ्यांकडे पैसे जास्त नसतात त्याच बरोबर शेतीमधून त्यांना जास्त नफा देखील राहत नाही कारण शेती हलके असते त्यामध्ये पीक चांगले येत नाही यामुळे अशा अडचणी निर्माण होत असतात. पीक चांगले येण्यासाठी सर्वप्रथम पाणी असणे गरजेचे आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी एक संजीवनीच योजना म्हणता येईल. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जी शासनाकडून आर्थिक मदत होणार आहे त्या आर्थिक मदतीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतामध्ये विहीर घेऊ शकतात. शेतामध्ये जर स्वतःची विहीर असेल तर आपण आपल्या पिकाला देखील पाण्याची व्यवस्था करू शकतोत. मुख्य म्हणजे शेतकऱ्यांना शेतामध्ये गेल्यानंतर पिण्याच्या पाण्याची समस्या देखील सोडवता येईल. शेतामध्ये जर एखादी
विहीर असेल तर तिथून आपण आपल्या पिकांसाठी सिंचनाची व्यवस्था देखील करू शकतो.

महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी ही योजना चालू करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी काही कागदपत्रे लागत आहेत ती कागदपत्रे जर आपल्याकडे असतील आणि या योजनेच्या असणाऱ्या अटी व पात्रता आहेत. ती आवश्यक कागदपत्रे आपल्याकडे असतील तर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो. आपण पाहतो ग्रामीण भागातील शेतकरी हे पैसे जवळ नसल्याकारणाने विहीर देखील घेत नसतात.त्यामुळे त्यांच्या पिकाचे अजूनच नुकसान होते म्हणजेच पाणी योग्य वेळेला भेटत नाही.

महाराष्ट्र राज्यामध्ये राहणारे शेतकरी हे त्यांच्याकडे पिकासाठी पाण्याची सोय नसल्याकारणाने शेतीकडे देखील दुर्लक्ष करताना पाहायला मिळतात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहीर करण्यासाठी अनुदान देण्यात येते त्यामुळे बरेच काही शेतकरी आपल्या स्वतःच्या शेतामध्ये विहीर करून घेत असतात. मागेल त्याला विहीर या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील तसेच शहरी भागांमधील देखील ज्या शेतकऱ्यांना विहिरीची गरज आहे असे शेतकरी या योजनेचा लाभ घेत असतात. शेतामध्ये पाणी साचण्याची सोय नसल्यामुळे खूप अडचणी येत असतात त्या अडचणीला शेतकऱ्याला सामोरे जावे लागते. महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या अशा गोरगरीब त्याचबरोबर ज्यांची आर्थिक दृष्ट्या परिस्थिती चांगली नाही अशासाठी स्तर महाराष्ट्र सरकार अशा नवनवीन योजनेची घोषणा करताना आपल्याला पाहायला मिळतो. या योजनेअंतर्गत त्या गोरगरीब शेतकऱ्यांना काही फायदा मिळेल आणि त्यांचे पीक चांगले येईल हा हेतू असतो.

मागेल त्याला विहीर या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात ते जाणून घेऊ.

कोणत्याही योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याकडे त्या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे असते. उत्पन्नाचा दाखला त्याचबरोबर राशन कार्ड, जमिनीची कागदपत्रे सातबारा उतारा,पासपोर्ट आकाराचे फोटो, आधार कार्ड, रहिवासी दाखला, रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड, बँक खात्याचा तपशील आणि स्वतःचा मोबाईल नंबर देणे आवश्यक असते.

वरी सांगितलेली सर्व कागदपत्रे जर आपल्याकडे असतील तर आपण या योजनेसाठी अर्ज करू शकतो. या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर आपल्याकडे वरी दिलेली सर्व कागदपत्रे असायला पाहिजे.

मागेल त्याला विहीर या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहेत ते जाणून घेऊ.

मागील त्याला विहीर या योजनेचे उद्दिष्ट खाली दिल्याप्रमाणे आहेत. राज्यातील जे गोरगरीब शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे हे देखील या योजनेचे एक मुख्य वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये राहणाऱ्या शेतकरी त्याचबरोबर त्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही अशा शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था करून देण्याचे देखील या योजनेचे एक मुख्य उद्दिष्ट आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सिंचनाची सोय नाही अशा शेतकऱ्यांना सिंचनाची सोय करून देण्यासाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर नाही असे शेतकरी पीक चांगले यावे त्यामुळे पूर्णतः पावसा वरती अवलंबून असतात जेव्हा पाऊस येईल तेव्हाच त्या पिकाला पाणी मिळेल कारण त्यांच्याकडे पाण्याची साठवणूक म्हणून विहीर नसते त्यामुळे शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्याची चिंता करावी लागू नये म्हणून महाराष्ट्र राज्यात तील शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना पाण्याची चिंता राहू नये.

ज्या शेतकऱ्यांना शेतामध्ये विहीर घ्यायची आहे परंतु त्यांच्याकडे पैसे नाहीत असे शेतकरी दुसऱ्याकडून पैसे घेत असतात तर त्यांनी दुसऱ्याच्या पैशावरती अवलंबून राहू नये हे देखील या योजनेचे एक मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचनाची सोय नाही अशा शेतकऱ्यांना सिंचनाची सोय करून देणे. शेतकऱ्यांना पाण्याचा पर्याय निवडून देण्यासाठी त्याच बरोबर पाण्याचा पर्याय निवडल्यानंतर शेतकऱ्यांचे भविष्य हे उज्वल करण्यासाठी या योजनेचा वापर होईल हे एक मुख्य उद्दिष्ट आहे.Magel tyala Vihir

मागेल त्याला विहीर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठीच्या अटी आणि पात्रता जाणून घेऊ

मागेल त्याला विहीर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खाली दिलेले जे नियम आहेत त्या नियमांमध्ये आपण बसलो पाहिजे. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या सर्व अटीमध्ये आपण पात्र असायला पाहिजे. या योजनेचा लाभ इतर मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी मिळणार आहे. त्याचबरोबर मागील त्याला विहीर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ती व्यक्ती ही जॉब कार्ड धारक असायला पाहिजे. मागील त्याला विहिरी या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील असणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीला व त्या कुटुंबाला मिळणार आहे. या योजनेचा लाभ हा भटक्या व विमुक्त जाती प्रवर्गातील व्यक्तींना मिळणार आहे. या योजनेसाठी असे शेतकरी अर्ज करू शकते जे की महाराष्ट्रामध्ये राहणारे आहेत म्हणजेच महाराष्ट्रातील रहिवासी असणारे शेतकरी परंतु त्यांच्याकडे विहीर करण्यासाठी पैसे नाहीत परंतु विहीर घ्यायला इच्छुक आहेत असे व्यक्ती देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतात. ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झाली आहे त्यांचे वारसदार. इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी देखील या योजनेचा फायदा घेऊ शकतात.

मागेल त्याला विहीर या योजनेचे फायदे शेतकऱ्यांना कोणकोणते होणार ते जाणून घेऊ.

या योजनेअंतर्गत जर शेतकऱ्यांना विहीर मंजूर झाली तर शेतकऱ्यांच्या भरपूर अडचणी, समस्या दूर होतील. महाराष्ट्र राज्यातील शेतकरी हे स्वतःच्या शेतामध्ये जर विहीर घ्यायची ठरवले तर ते स्वालंबी बनतील. या योजनेचा मुख्य फायदा म्हणजेच जर शेतामध्ये विहीर घ्यायची ठरवले तर विहीर घेण्यासाठी कुणाकडूनही पैसे उधार घेण्याची त्याचबरोबर कोणाकडून व्याजाने घेण्याची गरज देखील लागणार नाही. शेतकऱ्यांना जर ही विहीर मंजूर झाली तर शेतकऱ्यांचे जे पाण्याअभावी होणारे पिकाचे नुकसान आहेत ते कमी होईल. पिकाचे नुकसान जर कमी झाले तर शेतकऱ्यांना हळूहळू आर्थिक दृष्ट्या फायदा होण्यास मदत होईल. मुख्य म्हणजे शेतकऱ्यांना पिकासाठी सिंचनाची सोय करता येईल.

मागेल त्याला विहीर या योजनेचा अर्ज कसा करावा

मागेल त्याला विहीर या योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल तर तो अर्ज हा ऑनलाइन करावा लागतो. आपण आपल्या जवळच्या सेतूमध्ये जाऊन देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतो. जर आपल्या जवळील व्यक्तीला मोबाईल मध्ये देखील ऑनलाइन अर्ज करता येत असेल तर Government ची वेबसाईट ओपन करून आपण हा अर्ज भरू शकतो. हा अर्ज ऑनलाईन करता येतो परंतु आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जायचे असेल तर वरी सांगितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन जावे. सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन गेल्यानंतर आपला ऑनलाईन अर्ज भरण्यात येईल.Magel tyala Vihir

Sharing Is Caring:

Leave a Comment