Kanda Lagavd Mahiti: नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची त्याचबरोबर फायद्याची माहिती पाहणार आहोत. कांदा हे पीक दिवसेंदिवस म्हणजेच प्रत्येक वर्षी घेतले जाणारे पीक आहे. कांदा हे पीक कधी घेतल्यानंतर त्याचे उत्पन्न चांगले होते हे आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. कांदा या पिकाची लागवड कधी करावी, कांदा पिकाची शेती करण्यासाठी जमीन कशी असायला पाहिजे, त्याचबरोबर हवामान कसे पाहिजे, कांदा या पिकाचे एकरी प्रमाण किती वापरावे लागते, त्याचबरोबर कांदा या पिकासाठी खत किती लागते ,पाणी व्यवस्थापन कसे लागते आणि कांदा या पिकाची लागवड केल्यानंतर ते किती दिवसांनी काढणीस येते या सर्व गोष्टींबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. आपल्याला देखील कांदा या पिकाची माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचावा कारण या लेखांमध्ये कांदा पिकाची लागवड करण्यापासून ते कांदा पीक कधी काढण्यात येते व त्याची काढणी कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती या लेखामध्ये दिली जाणार आहे.
कांदा हे पीक घ्यायचे असेल तर कशी पूर्वमशागत करावी लागते याबद्दल माहिती जाणून घेऊ.
शेतकऱ्याला शेतामध्ये कोणतीही पिक घ्यायचे असले तर त्यासाठी पूर्वमशागत करावी लागते. परंतु कोणते पीक घ्यायचे यावरती पूरमशागत कशी करायची यामध्ये थोडा फरक असतो. जर शेतामध्ये कांदा या पिकाची लागवड करायची असेल तर शेतकऱ्याला नांगरणी करत असताना त्या जमिनीची उभी आडवी अशी नांगरणी करावी लागते. नांगरणी केल्यानंतर देखील जमिनीमध्ये जी ढेकळे राहतात ती ढेकळे कुळवाच्या पाया देऊन फोडून घ्यावे लागते आणि जमीन भुसभुशीत करावी. कांदा या पिकाची किंवा कोणत्याही पिकाची लागवड करायची असेल आणि आपण आपल्या शेतामध्ये शेणखत टाकले तर ते त्या पिकासाठी फायद्याचे ठरते. कांदा या पिकाची लागवड करायची असल्यास जमिनीमध्ये दहा ते पंधरा टन शेणखत हे एकरी मिसळावे. कोणत्याही पिकाच्या लागवडीसाठी आपण शेणखत हे शेतामध्ये टाकत असतो परंतु कांद्याच्या पिकाची पूर्वक स्वागत करत असताना ते शेणखत टाकताना त्यामध्ये पालाश जिवाणू एक लिटर, नत्र, स्फुरद, ट्रायकोडर्मा एक लिटर मिसळून घ्यावे. जर जमिनीची सांगितल्याप्रमाणे पुरोमशागत केली तर त्या वाढ चांगली होते त्याचबरोबर त्यामधून उत्पन्न देखील चांगले मिळते त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करत असताना चांगला फायदा मिळतो.
कांदा लागवड करण्यासाठी कशी जमीन निवडावी
शेतकरी हा शेतामध्ये वेगवेगळ्या पिक घेत असतात. त्यातीलच एक पीक म्हणजे कांदा. कांदा पिकाची लागवड करण्यासाठी जमीन कशी असायला पाहिजे याबद्दल आपण येथे जाणून घेणार आहोत. कांदा पिकाची लागवड करण्यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन असायला पाहिजे त्याचबरोबर ती जमीन जास्त हलकी पण नसावी आणि जास्त भारी पण नसावी म्हणजेच जमीन ही मध्यम भारी निवडावी. कांदा या पिकाची लागवड करण्यासाठी मध्यम भारी जमीन निवडावी कारण हे पीक ज्या जमिनीमध्ये चिकन माती आहे अशा जमिनीमध्ये त्याचबरोबर पाण्याचा निचरा होत नाही अशा जमिनीमध्ये त्या रोपांची वाढ होत नाही त्यामुळे ते पीक चांगले येत नाही म्हणून कांदा पिकाची लागवड करत असताना मध्यम भारी त्याचबरोबर पाण्याचा निचरा होणारी अशी जमीन निवडावी.
कांदा या पिकाची लागवड करण्यासाठी कसे हवामान असावे लागते.
शेतकरी कोणतेही पीक हे हवामानानुसार घेत असतात. परंतु कधीकधी कोणत्या हवामानामध्ये कोणते पीक घ्यावे हे लक्षात न आल्यामुळे त्या पिकातून त्यांना जेवढा पाहिजे तेवढा फायदा मिळत नाही त्यामुळे आपल्याला कोणतेही पीक घेण्याअगोदर त्या पिकाला कशी जमीन त्याचबरोबर कसे हवामान लागते हे माहीत असणे गरजेचे असते. चला तर मग जाणून घेऊ कांदा या पिकाच्या लागवडीसाठी कसे हवामान असणे गरजेचे आहे. हिवाळी हंगामामध्ये घेतले जाणारे कांदा हे पीक आहे. ज्यावेळी आपण कांदा या पिकाची लागवड करू त्या वेळेपासून पुढे दोन-तीन महिने हवामान गार व थंड असणे आवश्यक आहे. जसजसा कांदा मोठा व्हायला सुरुवात होईल तसतसे तापमान वाढले तरीसुद्धा चालते कारण कांद्याच्या वाढीसाठी तापमानातील वाढ हळूहळू फायद्याची ठरते. कांदा हे महाराष्ट्रातील सोम्य हवामानात घेतले जाणारे पीक आहे. कांदा या पिकाचे हवामानानुसार महाराष्ट्रामध्ये दोन ते तीन पिके घेतली जातात.
कांदा या पिकाच्या लागवडीसाठी कोणता हंगाम योग्य आहे जाणून घेऊन
सध्याच्या या काळामध्ये शेतकरी कोणत्याही हंगामामध्ये कांदा या पिकाची लागवड करताना आपल्याला बघायला मिळते. कांदा हे पीक रब्बी हंगामात त्याचबरोबर खरीप हंगामात तसेच उन्हाळी हंगामात देखील चांगले येते. परंतु कांदा लागवडीसाठी हवामान हे थंड पाहिजे. जर कांद्याची लागवड ही खरीप हंगामात करायची असेल तर ती लागवड जूनच्या सुरुवाती पासून ते ऑक्टोबर पर्यंत केली जाते. जर शेतकऱ्याला कांदा या पिकाची लागवड उन्हाळी हंगामामध्ये करायचे असेल तर जानेवारी एक जून महिन्यामध्ये करता येते. रब्बी हंगामात देखील कांदा या पिकाची लागवड केली जाते रब्बी हंगामामध्ये नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यांमध्ये कांदा या पिकाची लागवड करण्यात येते
कांदा या पिकासाठी पाणी किती प्रमाणात लागते व पाण्याचे व्यवस्थापन याबद्दल माहिती जाणून घेऊ
शेतकऱ्यांची पूर्ण शेती ही पाण्यावरती अवलंबून असते ज्यावेळी पाऊस पडतो किंवा शेतकऱ्याकडे पाणी साचवण्यासाठी काहीतरी सुविधा असतात तेव्हाच शेतकऱ्यांचे पीक शेतामधील चांगले येत असते. त्याचबरोबर आलेल्या पिकातून चांगला फायदा मिळवण्यासाठी देखील शेतकऱ्यांना पाण्याची अत्यंत गरज असते. कोणतेच पीक बिना पाण्याचे येत नाही. प्रत्येक पिकाला पाणी आवश्यक आहे. तसेच आज आपण जाणून घेऊ कांदा या पिकाची लागवड करायची असेल तर आपल्याकडे किती प्रमाणामध्ये पाणी असायला पाहिजे त्याचबरोबर आपण या पिकासाठी पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे. कांदा या पिकाला किती पाणी लागते हे त्या पिकाच्या हंगामावरती अवलंबून असते म्हणजेच आपण कोणत्या हंगामामध्ये कांद्याचे पीक घेतो त्यावरती ते पाण्याचे प्रमाण अवलंबून असते. जर आपण कांदा या पिकाची लागवड खरीप हंगामामध्ये केली तर त्या पिकाला दहा ते बारा दिवसाच्या अंतराने नियमित पाणी देणे महत्त्वाचे असते. जर कांदा या पिकाची लागवड उन्हाळी व रब्बी हंगामात केली तर सहा ते आठ दिवसांच्या अंतरावर ती त्या पिकाला पाणी देणे गरजेचे आहे. कोणत्याही हंगामामध्ये कांदा या पिकाची लागवड केल्यानंतर कांदा हा काढणीस आला की काढणीच्या तीन आठवडे अगोदर पाणी देणे बंद करावे. पाणी बंद केल्याने पानातील जो रस असतो तो कांद्यामध्ये लवकर उतरतो आणि कांदा काढणीस तयार होऊन लवकर काढण्यास येतो. अशा पद्धतीने कांदा या पिकाची लागवड करण्यासाठी पाण्याची नियोजन त्याचबरोबर व्यवस्थापन करावे लागते.
कांदा या पिकाची काढणी करण्यास कधी येते त्याचबरोबर त्यातून किती उत्पादन मिळते.
कांदा या पिकाची लागवड करत असताना शेतकऱ्यांना खूप मेहनत करावी लागते आणि हे पीक लागवडीनंतर साडेतीन ते साडेचार महिन्यांमध्ये काढण्यासाठी तयार होते. कांदा काढण्याला कधी येतो हे कसे ओळखावे ते जाणून घेऊ. कांद्याची पात जेव्हा पिवळी पडते त्याचबरोबर मानेत जेव्हा कांदा पिवळा होतो आणि त्याची पात ही आडवी पडते. जर आपल्याला असे आढळले तर तो कांदा काढणीस आलेला आहे असे समजावे. कांदा पिवळा पडल्यानंतर त्याची पात आडवी पडते त्यालाच मान मोडणे असे म्हणतात. म्हणूनच सोप्या भाषेमध्ये कांदा काढणीस तेव्हा येतो जेव्हा कांद्याची मान मोडते त्यावेळी कांदा काढणीस आला किंवा कांदा पक्व झाला असे समजले जाते. कांदा काढण्याची पद्धत कशी असते ते बघू. कांदा हा काढण्यात आल्यानंतर कांद्याच्या आजूबाजूची जी जमीन आहे ती आपण कुदळीच्या साह्याने थोडीशी मोकळी करून घ्यावी नंतर कांदे उपटावेत. सर्व कांदा काढून झाल्यानंतर चार-पाच दिवसांनी कांदा हा त्याच्या पाच ते सकट शेतामध्ये ढिगारे करून ठेवावा.
चार ते पाच दिवसांनी दिगारे केल्यानंतर कांद्याची मुळे त्याचबरोबर पात कापण्यास सुरुवात करावी परंतु पात कापत असताना कांद्यापासून लांबी तीन ते चार सेंटीमीटर ठेवून कापावी. कांदा या पिकाची मुळे व पात कापून झाल्याच्या नंतर तो कांदा चार-पाच दिवस सावलीत सुकून घ्यावा. ही आहे कांदा काढण्याची पद्धत. ही आहे कांदा लावण्यापासून ते काढणीपर्यंतची संपूर्ण माहिती जर आपण अशा पद्धतीने कांदा या पिकाची लागवड केली तर आपल्याला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर कोणत्याही पिक घ्यायचे असेल तर पाण्याची देखील आवश्यकता असते.